Tarun Bharat

जिल्हय़ाच्या प्रारुप आराखडय़ात 110 कोटींची वाढ

375 कोटींच्या आराखडय़ास मान्यता, सातारा सैनिक स्कूल विकासासाठी विशेष तरतूद

सातारा

सातारा जिह्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2021-2022 मूळ 264 कोटी रुपयाच्या प्रारूप आराखडय़ात 110.50 कोटी वाढ करून 375 कोटी रुपयाच्या निधीच्या आराखडय़ास मंजूरी देण्यात आल्याची माहिती देऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सातारा शहरात सैनिक स्कूल सुरु झाले आहे. या सैनिक स्कूलचा राज्यासह देशात नावलौकीक वाढावा यासाठी येथील इमारती व इतर कामांसाठी वेगळ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल अशी ग्वाहीही वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 जिल्हा वार्षिक योजना 2021-22 (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन पुणे येथे वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सहकार व पणन तथा साताऱयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, अतिरिक्त मुख्य सचिव देबाषीश चक्रवर्ती, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

स्मशानभूमी शेडला सिमेंट क्रॉकिंटचे स्लॅब टाकावे 

सातारा जिह्यात वन विभागाने फॅगोडाचे काम अतिशय उत्तम करावे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, आत्तापर्यंत वन विभागाच्या माध्यमातून जिह्यात विविध ठिकाणी वेळोवेळी वृक्षारोपण करण्यात आले आहे. या वृक्ष जगविण्यासाठी मनरेगाचा निधी वापरावा. स्मशानभूमीतील पत्र्यांचे शेड हे वारा, पाऊस व ज्वालामुळे खराब होऊ शकतात. त्यामुळे स्मशानभूमीतील शेड कायमस्वरुपी रहावे यासाठी सिमेंट क्राँक्रीटचे स्लॅब टाकावे, अशाही त्यांनी बैठकीत सूचना केल्या.

महाविद्यालयाच्या जागेतील झाडे तोडली जाणार नाहीत

  सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्याबाबतीत प्रत्येक 15 दिवसांनी वरिष्ठस्तरावर बैठक घेण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या कृष्णानगर येथील जागेवर अतिक्रमण होणार नाही तसेच तेथील झाडे तोडली जाणार नाहीत यावर लक्ष द्या, असे कोणी केलेले आढळले तर त्यावर कडक कारवाई करावी. याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे तसेच पालकमंत्री यांनी वेळोवेळी भेटी देऊन आढावा घ्यावा अशी सूचनाही केली.

  पर्यटनाचा चालना देण्यासाठी महाबळेश्वरचा विकास, राज्यासह देशात सातारा सैनिक स्कूलचा नावलौकीक वाढावा यासाठी इमारत, इतर सुविधा व सुशोभीकरणासाठी तसेच शासकीय विश्रामगृहात देण्यात येणाऱया सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येणार असल्याचेही वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले. यावेळी आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे यांनी विकासाबाबत मुद्दे उपस्थित केले.

Related Stories

कोरोना पॉझिटिव्ह महिलेमुळे राजारामपुरी शाहूनगर कंटेनमेंट

Archana Banage

26/11चा शाहिद हुतात्माना श्रद्धांजली

Patil_p

संशयित प्रियकरास पोलीस कोठडी

Patil_p

केळवली धबधबा पर्यटकांनी बहरला!

Patil_p

पवारसाहेब देणार कोणता कानमंत्र?

Patil_p

अब्दुल लाट सरपंच अपात्र

Archana Banage