बेळगाव : कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी विकेंडच्या दिवशी गोकाक फॉल्स व गोडचिनमलकी पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. शनिवारी व रविवारी गोकाक फॉल्स, धुपदाळ व गोडचिनमलकी येथे पर्यटकांची गर्दी होते. ही गोष्ट लक्षात घेऊन शनिवार-रविवारसह इतर सुटीच्या दिवशी या पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱयांनी गुरुवार दि. 15 जुलै रोजी यासंबंधी आदेश जारी केला आहे. गोकाक फॉल्स, धुपदाळ व गोडचिनमलकी येथे महाराष्ट्रासह वेगवेगळय़ा राज्यातून पर्यटक मोठय़ा संख्येने येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. शनिवारी, रविवारी व इतर सुटीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढते. ही गोष्ट लक्षात घेऊन सुटीच्या दिवशी या तिन्ही पर्यटनस्थळांवर नागरिकांना भेट देण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

