Tarun Bharat

जिल्हय़ातील हॉटस्पॉटमध्ये लवकरच ‘अँटीजेन टेस्ट’

Advertisements

कृष्णात पुरेकर / कोल्हापूर

जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे इचलकरंजी, कुंरूंदवाड आदी ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट तयार होत आहेत. कोरोनाच्या जलद निदानासाठी या भागात लवकरच अँटीजेन टेस्ट घेतल्या जाणार आहेत. अर्ध्या तासांत या चाचणीद्वारे कोरोनाचा रिपोर्ट मिळणार आहे. जिल्हय़ात अँटीजेन टेस्टसाठी डिटेक्शन कीट सोमवारी, मंगळवारी दाखल होत आहेत. या सप्ताहात डिटेक्शन कीटद्वारे कोरोना हॉटस्पॉटमध्ये रॅपीड अँटीजेन टेस्ट होणार आहेत. यासंदर्भात आराग्य विभागातून कार्यवाही सुरू असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

‘कोरोना’च्या जलद निदानासाठी इंडियन कौन्सील ऑफ मेडीकल रिसर्च (आयसीएमआर) आणि ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) यांनी तपासणीअंती ‘स्टॅडर्ड क्यु कोव्हीड १९ एजी डिटेक्शन’ कीटला मान्यता दिली. या कीटद्वारे केलेल्या ‘सार्स कोव्हीड २’ चे रॅपीट ऍटीजेन’ टेस्टद्वारे रूग्णातील व्हायरल विषाणूच्या प्रमाणावर पॉझिटिव्हचे निदान ८५ टक्क्यांपर्यत अचूक होत आहे. त्यामुळे तातडीच्या निदानासाठी अँटिजेन टेस्टचा वापर राज्य शासनाकडून होणार आहे.

एका डिटेक्शन कीटमध्ये २५ अँटीजेन टेस्ट
रॅपीड अँटीजेन तपासणीसाठी एका डिटेक्शन किटमध्ये २५ चाचण्या होतात. राज्यात ‘अँटीजेन’च्या १ लाख टेस्ट होणार आहेत. एका किटची किंमत ५०० रूपये आहे. शासनाने ४० हजार डिटेक्शन कीट खरेदी केली आहेत. राज्य आपत्ती निवारण अंतर्गत साडेचार कोटींचा निधी त्यासाठी दिला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रूग्णालयांकडे ही डिटेक्शन कीट दाखल होत आहेत. कोरोना हॉटस्पॉट, कंटेन्मेंट झोनमध्ये डिटेक्शन कीटद्वारे ऍटीजेन टेस्ट होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ४० हजार डिटेक्शन कीट मिळाली आहेत. त्यातील काही कीट राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य विभागाकडे सोमवारी दाखल होत आहेत. सप्ताहभरात डिटेक्शन कीटद्वारे रॅपीड ऍंटीजेन टेस्ट हॉटस्पॉट, कंटेन्मेंट झोनमध्ये होणार आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसंदर्भात रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ‘कोरोना’शी निगडीत बैठकीतही डिटेक्शन कीटबाबत चर्चा झाल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. दरम्यान, अँटीबॉडी टेस्टसंदर्भातही प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

कोणाची होणार रॅपीड अँटीजेन टेस्ट
फ्ल्यूसदृश्य लक्षणे असलेल्या, ‘कोरोना पॉझिटिव्ह’च्या संपर्कातील आलेल्या पण लक्षणे नसलेल्या, तसेच मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आदी व्याधीग्रस्त आणि गर्भवतींची तातडीने उपचारासाठी रॅपीड अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. रूग्ण ज्या ठिकाणी आहे तेथे डिटेक्शन कीटद्वारे रूग्णाचा स्वॅब घेऊन या टेस्टने अर्ध्या तासात कोरोनाचे निदान होणार आहे. या टेस्टद्वारे रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच या स्वॅबची आरटीपीसीआर लॅबद्वारे पुर्नतपासणी होणार आहे.

Related Stories

कोल्हापूर : वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी यांचे निधन

Archana Banage

सामर्थ्य सोशल फौंडेशन समाजोपयोगी कार्य करेल

Patil_p

महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट

Tousif Mujawar

Nashik Oxygen Leak : मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो याचिका; राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

Archana Banage

कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस मिळावी

Archana Banage

शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

Archana Banage
error: Content is protected !!