Tarun Bharat

जिल्हय़ातील 34 धरणे तुडुंब भरली

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यात गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता चांगलाच जोर धरलेला आहे. गेल्या 2 दिवसांत सतत कोसळणाऱया मुसळधार पावसाने जिल्हय़ाला झोडपून काढले आहे. जिल्ह्य़ातील विविध ठिकाणच्या धरण क्षेत्रात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्य़ातील 65 धरणांपैकी 34 धरणं 100 टक्के भरल्याचे सांगण्यात येत आहे.

  यावर्षी जिल्ह्य़ात पावसाचे वेळीच आगमन झाले. तेव्हापासून पर्जन्यमान चांगले राहिले आहे. मध्यंतरी सुमारे आठवडाभर पावसाचा लपंडाव सुरू होता. पण आता पुन्हा जोर वाढला आहे. गेल्या 2 दिवसांपासून तर रत्नागिरीत अतिवृष्टी होत असल्याचा प्रत्यय येत आहे.  जिह्यात गेल्या 24 तासात सरासरी 41.77  मिमी तर एकूण 375.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 0.5 , दापोली 7.70 मिमी, खेड 33.30 मिमी, गुहागर 20.80 मिमी, चिपळूण 25.30 मिमी, संगमेश्वर 76.40 मिमी, रत्नागिरी 83.00 मिमी, राजापूर 53.30 मिमी, लांजा 74.80 पावसाची नोंद झाली आहे.

 जिह्यात पावसाची संततधार सुरू आहे. समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. तसेच धरण क्षेत्रातही पाऊस चांगलाच बरसत असल्याने काही धरणं 100 टक्के भरली आहेत. जिल्हय़ात 100 टक्के भरलेल्या  34 धरणांमध्ये 2 मध्यम प्रकल्पांचाही समावेश आहे. गडनदी व अर्जुना हे दोन मध्यम प्रकल्पही 100 टक्के भरले आहेत. तर 2 धरणं 90 टक्केपेक्षा जास्त भरली आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यातील 2, दापोलीतील 5, खेडमधील 4, चिपळूणमधील 7, गुहागरमधील 1, संगमेश्वरमधील 5, रत्नागिरीतील 1, लांजा तालुक्यातील 5, राजापूरमधील 4 एकूण 34 धरणांचा समावेश आहे.

Related Stories

रत्नागिरी : दापोली येथील अभय भास्कर कर्वे यांचे निधन

Archana Banage

दुबळय़ा काँग्रेसचा बलाढय़ शिवसेनेच्या खासदारांना शह!

Patil_p

जेलीफिशचा वाढता वावर मासेमारीच्या मुळावर

Patil_p

पोषण आहार न तपासताच मुख्याध्यापक करतात वाटप

Amit Kulkarni

नेहरू युवा केंद्र आणि The Blue Wings युवा मंडळातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

Anuja Kudatarkar

सराफ व्यापारी खून प्रकरण : व्यापाऱ्याकडील सोने-चांदी, रोकड पोलिसांकडून जप्त

Archana Banage
error: Content is protected !!