Tarun Bharat

जिल्हय़ातील 360 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाबाबत उत्सुकता शिगेला

सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हय़ात ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मोठय़ा उत्साहात मतदारांनी मतदान केले. 360 ग्रामपंचायतीचे 68.21 टक्के मतदान झाले असून 4 लाख 59 हजार हजार 121 मतदारांपैकी 3 लाख 13 हजार 180 मतदारांनी जिल्हयात मतदानाचा हक्क बजावला आहे. आता उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष सोमवारी जाहीर होणाऱया निकालाकडे लागून राहिले आहे. कोकणात गेले अनेक वर्षे ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निकालाकडे सर्वच पक्षांचे लक्ष आहेच मात्र लोकांचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे.  

जिल्हय़ात 479 ग्रामपंचायती निवणूका जाहीर करण्यात आले होते मात्र यातील 119 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. जिल्हय़ात एकूण 68.21 टक्के मतदान झाले यामध्ये मंडणगडमध्ये 68.48, दापोली 67.82, खेड- 72.53, चिपळूण- 71.08, गुहागर- 61.23, संगमेश्वर- 64.14, रत्नागिरी- 68.56, लांजा 66.57, राजापूर 67.55 इतके मतदान झाले आहे.

रत्नागिरी जिल्हय़ातील मतदान झालेल्या 360 ग्रामपंचायतींच्या निकालासाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. यामुळे आज कोणाचा निकाल लागणार याची उत्सुकता वाढली आहे. जिल्हय़ात मोजक्या ठिकाणीच महाविकास आघाडी असून बहुतांश ठिकाणी शिवसेना-राष्ट्रवादी-भाजप असा सामना रंगला आहे. तर अनेक ठिकाणी गाव पॅनॅल व मनसेही आपले नशिब आजमावत आहे. याशिवाय काही ठिकाणी शिवसेना विरूध्द शिवसेना असाही रंगला असून त्यामुळे आजच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हय़ातील 360 ग्रामपंचायतींच्या 914 प्रभागात 2009 उमेदवार रिंगणात असून जिल्हय़ात एकूण 68.21 टक्के मतदान झाले आहे. एकूण 360 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या त्यापैकी 119 ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आजचा निकाल कोकणवासियांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. जिल्हय़ात खरी लढत ही शिवसेना-भाजप मध्ये झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, यंदा मनसेनेही जिल्हय़ातील काही भागांमध्ये चांगला प्रचार केला होता त्यामुळे यंदा ग्रामपंचायत निवडणूकीत मनसेलाही कितपत यश मिळणार याचीही चर्चा सुरू आहे.

रत्नागिरी तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींचे मतमोजणी येथील सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. 9 फेऱयांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. यावेळी सर्व उमेदवारांना, नागरिकांना मास्क अनिवाहर्य़ आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी व काळजी प्रत्येकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

महापुरातून सावरण्याआधीच ‘डेंग्यु’चा हल्ला!

Patil_p

माजगाव येथे ईरटीका कारला टीव्हीएस वेगो दुचाकीची धडक

Anuja Kudatarkar

लुपिन फाऊंडेशनकडून चराठा विलगीकरण कक्षासाठी कोविड प्रतिबंधात्मक साधने

Anuja Kudatarkar

देणी न मिळाल्याने लघु उद्योजक अडचणीत!

NIKHIL_N

मोती तलावाच्या सांडव्यात पडलेल्या फळ विक्रेत्याची मृत्यूशी झुंज अयशस्वी

Anuja Kudatarkar

अल्पमोली बहुगुणी दिवाळी अंक : ऍड.पटवर्धन

Patil_p