Tarun Bharat

जिल्हय़ातील 402 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Advertisements

रविवारी 8 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्येतही घट

प्रतिनिधी / बेळगाव

रविवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील 402 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 8 नवे रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे. यामध्ये बेळगाव शहर व उपनगरांतील पाच जणांचा समावेश आहे.

चिदंबरनगर, राणी चन्नम्मानगर, अंजनेयनगर, जक्केरीहोंडा, मलिकवाड, सौंदत्ती, अथणी, गोकाक येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 704 वर पोहोचली असून त्यापैकी 26 हजार 250 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 1641 जणांचे अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत 4 लाख 72 हजार 631 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4 लाख 41 हजार 693 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 342 जण दगावले आहेत. अद्याप 30 हजारहून अधिक जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 112 वर उतरली आहे. आता कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Related Stories

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱया तरुणाला पोलीस कोठडी

Patil_p

प्राणघातक हल्ल्यात वृद्ध ठार

Tousif Mujawar

शिक्षक हा समाजाच्या विकासाचा पाया

Amit Kulkarni

अनगोळ चव्हाटा देवळात दीपोत्सव उत्साहात

Omkar B

आमदार पूर्णिमा श्रीनिवास यांना मंत्रिपद द्यावे

Patil_p

संजीव हंचिनमनींचा 25 तास जलयोगाचा विक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!