Tarun Bharat

जिल्हय़ात आजपासून मुसळधारचा इशारा

प्रतिनिधी/ रत्नािगरी

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावानंतरही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात मंगळवार 5 ते 9 ऑक्टोबर हे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दसऱयात घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिल्ह्य़ात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  ऑक्टोबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची अपेक्षा होती. गेल्या 3 दिवसांपासून कडाक्याच्या उन्हाचे जोरदार चटके जाणवू लागल्याने ऑक्टोबर हिट सुरू झाल्याचा प्रत्यय येऊ लागला होता. पण पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे. पर्जन्यमानविषयक संदेशानुसार 5 ते 9 ऑक्टोबर या काळात जिह्यात काही ठिकाणी विजांचा गडगडाट व वादळी वाऱयासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पावसाच्या सावटाने भातकापणीच्या कामाला पुन्हा ब्रेक लागला आहे. असाच पाऊस राहिल्यास कापणीस आलेल्या भातपिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.

Related Stories

हरित लवाद निर्णयाविरोधात जांभा व्यावसायिक सर्वोच्च न्यायालयात

Patil_p

”व्यक्त व्हा… आठवणी जागवा” ; कोमसापचा अनोखा उपक्रम

Anuja Kudatarkar

रत्नागिरी महिला रुग्णालय मंगळवारपासून कोविड सेंटर म्हणून सुरू होणार

Archana Banage

कोनशी – दाभिल उपसरपंच पदी अर्जुन उर्फ नाना सावंत

Anuja Kudatarkar

युवा रक्तदाता संघटनेच्या दणक्यानंतर रक्तपेढीतील एसी यंत्रणा अखेर कार्यान्वित

NIKHIL_N

शाळा प्रवेशोत्सवाविनाच आजपासून ऑनलाईन ‘श्रीगणेशा’

Patil_p