Tarun Bharat

जिल्हय़ात आणखी 38 कोरोना रुग्णांची भर

एकूण बाधितांची संख्या तीनशेच्या उंबरठय़ावर, वडगाव येथील चौघा जणांना बाधा

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच आहे. रविवारी आणखी 38 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये ढोरवाडा-वडगाव येथील चौघा जणांचा समावेश आहे. हुक्केरी तालुक्मयातील कोट, दड्डी, ढाणेवाडीसह चिकोडी तालुक्मयातील रुग्णांचाही यामध्ये समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या 295 वर पोहोचली आहे.

रविवारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. सर्व बाधितांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून यापैकी बहुतेक जण मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागातून परतलेले आहेत. यामध्ये आठ लहान मुलांचा समावेश आहे.

35 वषीय युवक, 64 वषीय वृद्ध, 61 वषीय वृद्धा, 31 वषीय महिला, 25 वषीय तरुण, 43 वषीय युवक, 24 वषीय तरुण, 28 वषीय दोन तरुण, 36 वषीय युवक, 30 वषीय महिला, 20 वषीय तरुण, 7 वषीय बालिका, 4 वर्षाची बालिका, 28 वषीय महिला, 9 वर्षाची बालिका, 36 वषीय युवक, 30 वषीय महिला, 15 वषीय मुलगी, 5 वषीय बालक, 20 वषीय तरुण, 10 वर्षाची मुलगी, 52 वषीय इसम, 20 वर्षीय तरुण, 47 वषीय इसम, 20 वषीय तरुण, 22 वषीय तरुण, 26 वषीय तरुण, 12 वषीय मुलगा, 25 वर्षीय तरुण, 35 वषीय युवक, 17 वषीय तरुण, 45 वर्षीय इसम, 24 वषीय तरुण, 7 वषीय बालक, 28 वषीय तरुण, 27 वषीय महिला व 6 वषीय बालिकेचा यामध्ये समावेश आहे.

सर्व बाधितांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. ढोरवाडा-वडगाव येथील एकाच कुटुंबातील चौघे जण धारावी (मुंबई) येथून परतले होते. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तातडीने 108 रुग्णवाहिकेतून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. पोलिसांनी या परिसरात बॅरिकेड्स उभे करून रस्ते बंद केले आहेत.

दरम्यान, जिल्हा सर्वेक्षण विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 14 हजार 693 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले असून सध्या 4 हजार 604 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 13 हजार 397 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यापैकी 12 हजार 625 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 295 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 165 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 137 जणांवर उपचार करण्यात येत आहेत.

आणखी 220 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा

उपलब्ध माहितीनुसार प्रशासनाला आणखी 220 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. बेळगाव, हुक्केरी, चिकोडी तालुक्मयात मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या चाकरमान्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून त्यामुळे बाधितांची संख्या वाढती आहे. सर्व बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मात्र, रुग्णांची परवड सुरू असल्याचे सामोरे आले आहे.

आणखी 12 जण झाले कोरोनामुक्त

अथणी, हुक्केरी तालुक्मयातील कोट, बिदरेवाडी, धोंडगट्टे, दड्डी, रायबाग तालुक्मयातील कुडची, बेळगाव तालुक्मयातील भेंडीगेरी, मार्कंडेयनगर व नेहरूनगर येथील 12 जण कोरोनामुक्त झाले असून रविवारी त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. एकूण बाधितांची संख्या 295 वर पोहोचली आहे. यापैकी 165 जण बरे झाले आहेत, अशी माहिती बिम्स प्रशासनाने दिली आहे.

Related Stories

तवंदी घाटात भीषण अपघातात दोघे ठार

Patil_p

अपघातात काकती येथील तरुण ठार

Patil_p

भारतीय संस्कृती, सामाजिक, धार्मिक चिंतनासाठी कल्याण मंडप उपयोगी

Omkar B

विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांचे विचार समाजामध्ये रुजविणे आवश्यक

Amit Kulkarni

वीज ग्राहकांना दिलासा?

Patil_p

लोकमान्य सोसायटीच्या ठेवी व्याजदरात वाढ

Amit Kulkarni