Tarun Bharat

जिल्हय़ात आणखी 92 पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

74 जणांना डिस्चार्ज, 2 हजार 450 कोरोनामुक्त : सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 112

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असून रविवारी आणखी 92 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 74 बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

जिल्हय़ात कोरोना वाढीचा वेग अजूनही थांबलेला नाही दररोज 80 ते 90 रुग्ण आढळत आहेत. रविवारीही नव्याने 92 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 हजार 642 झाली आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून रविवारी आणखी 74 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बरे होऊन कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या अडीच हजाराच्या घरात गेली आहे. एकूण 2 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रविवारी तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने 80 जणांचे बळी गेले आहेत. सद्यस्थितीत आता जिल्हय़ात 1 हजार 112 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

अ. क्र.              विषय             संख्या

1       एकूण अहवाल                              24,950

2       पॉझिटिव्ह आलेले अहवाल                         3,642

3       निगेटिव्ह आलेले अहवाल                21,158

4       प्रतीक्षेतील अहवाल                                  150

5       सद्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 1,112

6       मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या                     80

7       डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण                      2,450

8       गृह व शासकीय संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती  4,832

9       नागरी क्षेत्रातील संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती  12,952

Related Stories

रत्नागिरी : लोटेतील सुप्रिया लाईफसायन्सचे दोन कोविड सेंटर उद्यापासून सेवेत

Archana Banage

खेडमध्ये भंगार गोदामातील स्फोटात कामगाराचा मृत्यू

Patil_p

…तर दिगवळे रस्त्यावरील अतिक्रमण शिवसेना हटवेल!

Anuja Kudatarkar

रत्नागिरी विभागातून आणखी 4 कर्मचारी निलंबित

Patil_p

कवठणी उपसरपंचपदी भाजपाच्या सोनम कवठणकर

Anuja Kudatarkar

नरेंद्र दाभोळकऱयांच्या खूनातील संशयित रत्नागिरीत

Patil_p