Tarun Bharat

जिल्हय़ात आतापर्यंत 92.47 टक्के रेशनवरील आहारधान्याचा पुरवठा

बेळगाव तालुक्मयात 91.24 टक्के पुरवठा

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना आहार धान्याचे वाटप करून त्यांच्या समस्या काही प्रमाणात कमी करण्याचे काम अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने सुरू आहे. या अंतर्गत बीपीएल आणि अंत्योदय रेशन कार्डधारकांना एप्रिल व मे महिन्यातील रेशन एकाच वेळी देण्यात आले आहे. सध्या केंद्र सरकारच्या गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत रेशन वाटप सुरू आहे. जिल्हय़ात आतापर्यंत 92.47 टक्के रेशनचे वाटप पूर्ण झाले असून, एकूण 11 लाख 18 हजार 836 रेशन कार्डधारकांपैकी 10 लाख 34 हजार 603 कार्डधारक नागरिकांनी आपले रेशनवरील साहित्य घेतले आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने देण्यात आली.

बेळगाव जिल्हय़ात एकूण 3,412 रेशन दुकाने असून, बेळगाव तालुक्मयात 594 दुकाने आहेत. शहरात 1 लाख 69 हजार 673 कार्डधारकांपैकी 1 लाख 54 हजार 810 कार्डधारकांनी रेशन दुकानातून आहारधान्य घेतले असून, शहरात 91.24 टक्के रेशनचे वाटप झाले आहे. तर 53167.98 क्विंटल आहार धान्य वाटप पूर्ण करण्यात आले आहे. पुढील दिवसात 100 टक्के रेशनचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व कार्डधारकांना पूर्ण प्रमाणात रेशनवरील तांदूळ व एक किलो तूरडाळ देण्यात येणार आहे. बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांसाठी मोफत वितरण सुरू असून एपीएल कार्डधारकांकडून 1 किलो तांदुळसाठी 15 रुपये दर आकारण्यात येत आहे. कार्डधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी खात्याचे साहाय्यक उपसंचालक सिद्दराम मारिहाळ यांनी केले आहे.

Related Stories

पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेला प्रारंभ

Omkar B

जिल्हय़ात सक्रिय रुग्णसंख्या दीड हजारांवर

Amit Kulkarni

खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

Patil_p

स्वरमल्हार फौंडेशनतर्फे गुरुपौर्णिमा संगीतसभा

Amit Kulkarni

हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद

Patil_p

नवे खांब; दिवे मात्र जुनेच

Amit Kulkarni