Tarun Bharat

जिल्हय़ात आशा-निराशेचा खेळ; १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

● २४ जणांची कोरोनावर मात
● कोरोनामुक्तीत पाटण तालुक्याची पन्नाशी
●शिरवळच्या ७२ वर्षीय वृद्धेचा मृत्यू

सातारा/प्रतिनिधी

जिल्हय़ातील सर्व तालुक्यांमध्ये हातपाय पसरलेल्या कोरोनाशी झुंज सुरू असून शुक्रवारी एकुण 24 जणांनी कोरोनावर मात केली. तर दिवसभरात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एका बाधित वृद्धेचा मृत्यू झाला. आकडय़ांच्या हिंदोळय़ांवर जिल्हय़ात आशा-निराशेचा खेळ सुरू आहे. कोरोनामुक्त होणारांचे जिल्हावासियांना दिलासा देत असून संख्या पाचशेकडे झेपावत असली तरी रोज नव्याने रूग्ण वाढतच आहेत. त्यातच मृत्यूचा आकडाही वाढताच आहे.

शुक्रवारी सकाळी सातारा येथील खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱया महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर येथील 30 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागास कळवण्यात आले होते. तर रात्री आलेल्या अहवालात जिल्हय़ातील 14 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकुण बाधितांचा आकडा 718 इतका झाला आहे.

शुक्रवारी बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील वडले येथील 24 वर्षीय पुरुष. कराड तालुक्यातील तुळसण 50 वर्षीय व 22 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला व 5 वर्षाची मुलगी, सैदापूर येथील 23 वर्षीय पुरुष, खिंडवाडी येथील 44 वर्षीय महिला. कोरेगाव तालुक्यातील साप येथील 39 वर्षीय पुरुष. जावली तालुक्यातील धोंडेवाडी येथील 51 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातीलङ राजाचे कुर्ले येथील 53 वर्षीय पुरुष. वाई तालुक्यातील वेळे येथील 50 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

जिल्हय़ात 24 जण कोरोनामुक्त

जिल्हय़ाची कोरोनामुक्तीची घोडदौड शुक्रवारीही सुरूच राहिली. कृष्णा, सहय़ाद्रिसह विविध कोरोना केअर सेंटरमधून 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कराडच्या कृष्णा रूग्णालयातून 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यात पाटण तालुक्यातील नवसरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय व 25 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, तामिणे येथील 25 वर्षीय पुरुष, कालेवाडी येथील 21 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 30 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. याबरोबरच कृष्णातून डिस्चार्जची संख्या 177 इतकी झाली आहे.

शिरवळच्या पोलिसाने केली मात

कृष्णातून डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णात शिरवळ पोलीस ठाण्यातील 30 वर्षीय पोलीस कर्मचाऱयाचा समावेश आहे. नाकाबंदीच्या निमित्ताने डय़ुटीवर असताना त्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. आज त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
कराडच्या सह्याद्री हॉस्पीटलमधून 9 जणांना सोडले. यात कराड तालुक्यातील रूग्णांचा समावेश आहे. कराड तालुक्यातील विंग येथील 19 युवक, 43 वर्षीय महिला, वानरवाडी येथील 9 मुलगा, 19 वर्षीय युवक, 7 वर्षीय मुलगा व 70 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर खटाव तालुक्यातील अंभेरी येथील 29 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय महिला, 5 वर्षाची मुलगी यांनाही डिस्चार्ज देण्यात आला.

खावली कोराना केअर सेंटरमधील खटाव तालुक्यातील डांभेवाडी येथील 46 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील कुस बुद्रुक येथील 19 वर्षीय युवक व 23 वर्षीय महिला, फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील 21 व 64 वर्षीय महिला, कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील 57 वर्षीय महिला तर वाई कोरोना केअर सेंटरमधून 45 वर्षीय पुरुष व 15 वर्षीय मुलगी यांना डिस्चार्ज देण्यात आला.

पाटणमध्ये कोरोनामुक्तीचे अर्धशतक, उपचारांत उरले 11 जण

कराडच्या सहय़ाद्रितून पाटण तालुक्यातील सहा जणांना घरी सोडण्यात आल्याने पाटणला कोरोनामुक्तांनी अर्धशतक गाठले आहे. पाटण तालुकाही कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून कोरोनामुक्त 52 तर बाधित केवळ 11 जण राहिले आहेत. एकुण 65 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. यातील दोन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सहा व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून त्यामध्ये नवसरी येथील चार, तामिणे व काळेवाडी (आडूळ) येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे प्रांत श्रीरंग तांबे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी. पाटील यांनी सांगितले.

कराड तालुक्यात उपचारांत उरले 34 जण

कराड तालुक्यामध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणे 73 टक्क्यांवर आहे. आज तालुक्यातील नव्याने बाधित झालेल्या विंग आणि वानरवाडी या दोन गावांमधील सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे तालुक्यात 209 पैकी 172 जण कोरोनामुक्त झाले असून 34 जण उपचारांत आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे.

105 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 29, पानमळेवाडी येथील 1, शिरवळ येथील 19, कराड येथील 6, वाई येथील 17, कोरेगाव येथील 2, मायणी येथील 13, दहिवडी येथील 5, महाबळेश्वर येथील 13 असे एकूण 105 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व एन.सी.सी.एस., पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

बळींचा आकडा 31

रात्री उशिरा सातारा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असणाऱया महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर येथील 30 वर्षीय महिलेचा कोरोना बाधित अहवाल आल्याचे खाजगी हॉस्पिटलने कळविले आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे आज सकाळी शिरवळ ता. खंडाळा येथील 72 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिला श्वसन संस्थेचा त्रास होत होता, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे बळींचा आकडा 31 झाला आहे.

81 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांनी 81 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल होते. आज सायंकाळी पुन्हा कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी केलेल्या 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात एकुण 104 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्हय़ात शुक्रवारपर्यंत
बाधित 718
मुक्त 472
ऍक्टिव्ह रूग्ण 213
बळी 3
1

शुक्रवारी
बाधित 15
मुक्त 24
बळी 1

.

Related Stories

जन्मदात्या आईनेच घेतला पाच महिन्याच्या मुलाचा जीव

Archana Banage

सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात; 10 ठार

datta jadhav

अवैध माती उत्खनन प्रकरणी चाळीस लाखांचा ऐवज जप्त

Patil_p

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सातारच्या खेळाडूंचा झेंडा

Patil_p

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सातारा जिल्हा दौऱ्यावर

Archana Banage

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती – नवाब मलिक

Archana Banage