Tarun Bharat

जिल्हय़ात कोरोनाचा वाढता कहर

सातारा प्रतिनिधी 

गेल्या दोन, तीन दिवसात पावसाचा वेग मंदावला आहे. मात्र कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून रविवारी उच्चांकी 443 बाधित आल्याने बाधितांचा एकूण आकडा 10 हजार 157 झाल्याने चिंता वाढली आहे. कराड व सातारा हॉटस्पॉट ठरले असून सातारा तालुक्यातील निगडीनजिक राजेवाडी गावात संसर्ग साखळी निर्माण झाल्याने हे गाव हॉटस्पॉट ठरलेय. तपासणींचा वेग वाढल्याने बाधित वाढत असून त्यांना लक्षणांप्रमाणे कोरोना केअर सेंटर, हॉस्पिटल्स व होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन जावू नये. संसर्ग वाढूच नये यासाठी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुवणे व सोशल डिस्टन्सचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 

दरम्यान, जिह्यात काल रविवारी रात्री आलेल्या रिपोर्ट नुसार 443  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तर दिवसभरात … जणांचा अहवाल बाधित आला असून रात्री उशिरा आलेल्या अहवालात … असा एकूण एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला आहे. सोमवारी दिवसभरात 240 एवढय़ा नागरिकांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिह्यातील 240 जणांची कोरोनावर मात

विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये ङकराडङतालुक्यातील 42, ङखंडाळाङ तालुक्यातील 11, ङखटावङ तालुक्यातील 9, ङकोरेगावङ तालुक्यातील 18, ङमहाबळेश्वरङ तालुक्यातील 4, ङपाटणङ तालुक्यातील 6,  ङसाताराङ तालुक्यातील 35, वाई तालुक्यातील 26  व इतर 89 असे एकूण 240 नागरिकांचा समावेश आहे.

घाबरु नका, काळजी घ्या : जिल्हाधिकारी शेखर सिंह

सध्या जिल्हय़ात तपासणींचा वेग वाढवण्यात आला आहे. रविवारी 2400 जणांचे तपासणी केल्यानंतर 443 जणांचा अहवाल बाधित आला आहे. लक्षणांनुसार उपचार व विलगीकरण करण्यात येत असून सध्या जिल्हय़ात लक्षणे नसलेले पण बाधित अहवाल आलेले एक हजार नागरिक होम आयसोलेट करण्यात आलेले आहेत. या नागरिकांनी होम आयसोलेशनचे नियम व शिस्त पाळावी तसेच त्यांना इतर काही त्रास झाल्यास 1077 क्रमांकावर फोन केल्यास त्यांना तातडीने उपचारांची सुविधा उपलब्ध केली जाईल. रुग्ण संख्या वाढत असली घाबरुन न जाता काळजी घेवून कोरोनाविरुध्दचा लढा जिंकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले आहे.

व्याधीग्रस्तांच्या सर्व्हेस सहकार्य करा  जिल्हय़ात 60 वर्षांपुढील नागरिकांना इतर व्याधी असतील तर त्यांचा सर्व्हे करण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरु आहे. गेल्या काही दिवसात अशा सर्व्हेत 170 ते 180 नागरिकांची लक्षणे असल्याने तपासणी केल्यावर तो बाधित आढळून आले आहेत. इतर मधुमेह, रक्तदाब वा अन्य व्याधी असल्यास तसेच लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी जवळच्या डॉक्टर, आरोग्य केंद्रात जावून कोरोना टेस्ट करुन घ्यावी. जेवढे जलद निदान होईल तेवढेच लवकर उपचार हे सुत्र घेवून आरोग्य विभाग करत असून आरोग्य विभागावर प्रचंड ताण वाढला असल्याचे सिंह यांनी सांगितले. 

Related Stories

सुधीरभाऊंचे भाषण ऐकताना ‘नटसम्राट’ पहात असल्याचा भास झाला : उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

नदीत आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

datta jadhav

राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल

datta jadhav

तारा तहसील कार्यालयात पार्किंगचा बटय़ाबोळ

Omkar B

विकेंड लॉकडाऊनमुळे पुन्हा शटर डाऊन

datta jadhav

कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Archana Banage
error: Content is protected !!