Tarun Bharat

जिल्हय़ात कोरोनाचा 24 वा बळी

दापोलीतील पिसई येथील वृद्धाचा मृत्यूरत्नगिरीत पोलीस

प्रतिनिधी/ दापोली, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हय़ात बुधवारी कोरोनाने 24 वा बळी घेतला असून दापोली तालुक्यातील पिसई-कुंभारवाडी येथील 64 वर्षीय वृद्धाचा बुधवारी रत्नागिरीत मृत्यू झाला. गेल्या चार दिवसातील कोरानामुळे झालेला हा सातवा मृत्यू असून मृतांच्या वाढत्या संख्येने घबराट पसरली आहे.

  मुंबई येथून 10 जून रोजी हा वृद्ध पिसई येथील आपल्या घरी आला होता. त्याला ताप व अन्य लक्षणे असल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून 15 जून रोजी  अधिक उपचारासाठी रत्नागिरीत जिल्हा कोव्हीड रूग्णालयात दाखल करण्यात आले. रत्नागिरीत असताना त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा जिल्हय़ातील 24 वा तर दापोलीतील कोरोनामुळे झालेला 5 वा मृत्यू आहे.

  रूग्णाच्या मृत्यूनंतर प्रशासनाने पिसई-कुंभारवाडी गाव निर्जंतूक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदर वृद्धाचा प्रत्यक्ष संपर्क झालेल्यांची यादी तयार करून त्यांची तपासणी करण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Related Stories

मालवणात 20 ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरची निर्मिती

NIKHIL_N

एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे मालवणातही परिवहनची वाहतूक ठप्प

Tousif Mujawar

खुनाच्या आरोपातून संशयितांची निर्दोष मुक्तता

NIKHIL_N

रत्नागिरी : एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

Archana Banage

चिपळुणात मांडूळ जातीच्या सापाची तस्करी

Patil_p

आनंदाश्रय हे समाजसेवेचे तीर्थक्षेत्र ! – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!