Tarun Bharat

जिल्हय़ात कोरोनाचे नवे 27 रूग्ण

Advertisements

जिल्हय़ात कोरोनाचे नवे 27 रूग्ण

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हय़ातील कोरोना रूग्णवाढीचे प्रमाण वाढत चालले आहे. शुक्रवारी जिह्यात नव्याने 27 कोरोनाचे रूग्ण सापडल्याने आरोग्य विभागासमोर चिंताजनक बाब ठरली आहे. तसेच लांजा तालुक्यातील 55 वर्षीय प्रौढाचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा यामुळे कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांचा आकडा 348पर्यंत पोहोचला आह़े

 जिह्यामध्ये शुक्रवारी करण्यात आलेल्या 999 कोरोना चाचण्यांपैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 26 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 1 कोरोनाबाधित रूग्ण आढळला. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 6, दापोली 2, चिपळूण 12, संगमेश्वर 6 व मंडणगड 1 असे रूग्ण सापडले. यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 9 हजार 540 इतकी झाली आह़े  तर मागील 24 तासात 6 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़  त्यामुळे कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 9 हजार 65 वर पोहोचली आह़े  जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 95.02 इतके आह़े

  मृतांच्या तालुकानिहाय आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 92, खेड 55, गुहागर 12, दापोली 37, चिपळूण 83, संगमेश्वर 35, लांजा 14, राजापूर 17 तर मंडणगडमध्ये 3 अशा एकूण 348 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

जिल्हय़ातील कोरोनाची स्थितीः   

   एकूण रूग्ण-9540

नवे रूग्ण -27

नवे मृत्यू -01

एकूण मृत्यू -348

Related Stories

जिह्यातील लसीकरण ठप्प?

Patil_p

वेंगुर्लेत शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : दापोलीत उद्या वीज बिल होळी आंदोलन

Archana Banage

दापोलीच्या पाऱयात पुन्हा घसरण, 11.7 अंश सेल्सिअस

Patil_p

जांभ्या दगडांच्या टाईल्स वाढवणार घरांची शोभा!

Patil_p

आर्यन धुळप, सई प्रभुदेसाई बुध्दीबळात विजेते

Patil_p
error: Content is protected !!