Tarun Bharat

जिल्हय़ात कोरोनाचे 67 नवे रूग्ण

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यात शुक्रवारी कोरोनामुळे दोघाजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर नव्याने 67 रूग्ण आढळून आले आहेत़  यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 35 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 32 रूग्ण आढळून आले आहेत़ जिल्हय़ात एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7 हजार 566 झाली आह़े

 या बाबत जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मृत झालेल्यांमध्ये रत्नागिरी येथील 80 वर्षीय महिला तर चिपळूण येथील 58 वर्षीय पुरूषाचा समावेश आह़े यामुळे जिह्यातील मृतांची संख्या 269 झाली आह़े रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर 3.5 टक्के आह़े शुक्रवारी आढळून आलेल्या रूग्णांमध्ये रत्नागिरी 37, चिपळूण 17, गुहागर 3, राजापूर 2, खेड 3,  अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 74, खेड 45, गुहागर 10, दापोली 29, चिपळूण 66, संगमेश्वर 24, लांजा 9, राजापूर 10 तर मंडणगडमध्ये 2 अशा एकूण 269 जणांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े

                      राजापुरात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू      

राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील एका परप्रांतिय कामगाराचा जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोनावर उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे. गोठणे दोनिवडे येथील एक परप्रांतिय कामगाराला आठवडाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचार सुरू असतानाच बुधवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान बुधवारी नव्याने चार कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. वरचीपेठ, हर्डी, हातदे गाववाडी व वडवली शिवाजीनगर येथील रूग्णांचा समावेश आहे. तर दोघेजण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

Related Stories

रत्नागिरी : सरपंच पदाची आरक्षण सोडत 15 डिसेंबर रोजी

Archana Banage

चाकरमान्यांच्या आगमनाने गर्दी वाढतीच

NIKHIL_N

खनिकर्म अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करा!

NIKHIL_N

खेड, संगमेश्वरात अवकाळी पाऊस

Patil_p

‘क्वारंटाईन’ शाळेत करताहेत सफाई

NIKHIL_N

राज्यातील यांत्रिक मच्छीमारांना मोठा दिलासा…

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!