Tarun Bharat

जिल्हय़ात दोन मच्छीमारी नौका बुडाल्या

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी / हर्णे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचा परिणाम रत्नागिरी जिल्हय़ातील सागरी किनारपट्टीला बसला आहे. समुद्रात वादळसदृश स्थिती असून दापोली तालुक्यातील 1 नौकेला जलसमाधी मिळाली तर दुसरी नौका सुदैवाने वाचली तर रत्नागिरी तालुक्यात एका नौकेला जलसमाधी मिळाली. सुदैवाने या दोन्ही घटनामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  दरम्यान, दोन्ही नौकांचे अंदाजे 20 लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.

   मिरकरवाडा येथून राजीवडा येथे डागडुजीसाठी जाणाऱया नौकेचे इंजिन बंद पडून खडकावर आपटल्याने बैतुल रिझवान नामक नौकेला सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास जलसमाधी मिळाल़ी यामध्ये नौकामालक जिक्रीया पटेल यांचे 5 लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती सहाय्यक मत्स्य आयुक्त ऩा व़ि भादुले यांनी दिल़ी

  मासेमारी हंगाम चालू झाल्यामुळे नौकेच्या डागडुजीसाठी बैतुल रिझवान ही नौका मिरकरवाडा येथून राजीवडा येथे जात होत़ी यावेळी नौकेमध्ये तांडेलासह 2 खलाशी होत़े यावेळी नौकेचे इंजिन बंद पडल्यामुळे ती खडकावर आपटल़ी खडकावर आपटल्यामुळे नौका बुडण्यास सुरुवात झाल़ी नौका बुडू लागल्याचे लक्षात येताच नौकेतील खलाशांनी समुद्रामध्ये उडी टाकून किनारा गाठल़ा

आंजर्ले खाडीत सिद्धीसागर बोटीला जलसमाधी!

दापोली तालुक्यातील गाळाने भरलेल्या आंजर्ले खाडीत सिद्धीसागर बोटीला सोमवारी जलसमाधी मिळाली, तर दुसरी बोट बुडता बुडता वाचली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र नौकेचे 15 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. या घटनेमुळे आंजर्ले खाडीतील गाळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  आंजर्ले खाडीच्या मुखाशी साठलेल्या गाळामुळे यापूर्वी अनेक बोटींना जलसमाधी मिळालेली असताना आज पुन्हा एकदा वासुदेव दोरकुळकर यांच्या सिद्धीसागर बोटीला जलसमाधी मिळाली. वादळी वारे आणि मुसळधार पावसाच्या इशाऱयामुळे सुरक्षिततेसाठी या बोटी आंजर्ले खाडीत आश्रयासाठी नेण्यात येत होत्या. खाडीच्या मुखाजवळ असलेल्या गाळामुळे तेथेच अडकून बोट बुडाली. गणपती सण तोंडावर आला असताना बोट बुडाल्याने वासुदेव दोरकुळकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  या बोटीवरील वासुदेव दोरकुळकर, अक्षय जुवाटकर, नारायण दोरकुळकर, नामदेव दोरकुळकर या चारहीजणांनी पोहत किनारा गाठला. आंजर्ले ग्रामस्थांनी त्यांना तातडीने मदतीचा हात दिला. याच दरम्यान या बोटीसोबतच असणारी प्रकाश दोरकुळकर यांची बोटही हेलकावे खाऊ लागल्याने बोटीवरील खलाशांत घबराट उडाली. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी पावरी टाकून बोट किनाऱयाकडे आणली. अनेकांनी बोट किनाऱयाला लावण्यास सहकार्य केले. दुसरी बोट वाचली असली तरी या बोटीचे मोठे नुकसान झाले आहे.

  आंजर्ले खाडीतील गाळ उपशाचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळलेला आहे. हर्णे बंदरात जेटी नसल्यामुळे या बंदरातील नौका वादळवाऱयासारख्या आपत्तीप्रसंगी आंजर्ले खाडीचाच आधार घेतात. मात्र ही खाडी गाळाने भरलेली असल्यामुळे नौका खाडीत नेताना दुर्घटना घडतात. यापूर्वीही भक्ती बोटीला येथेच जलसमाधी मिळाली होती. त्यामुळे आंजर्ले खाडीतील गाळ उपशाला आता तरी गती मिळू दे आणि भविष्यातील दुर्घटना टळू दे अशी मागणी मच्छीमार करत आहेत.

Related Stories

औद्यागिक दर्जाच्या विशेष सवलती आदरातिथ्य क्षेत्राला

NIKHIL_N

नारळ उत्पादनाला अतिवृष्टी, वादळी वाऱयांचा फटका

Patil_p

धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबरपासून होणार सुरू

NIKHIL_N

पावसाळय़ानंतरच आंबा घाटातून अवजड वाहतूक सुरू होणार

Patil_p

बांदा पोटनिवडणुकीत भाजपचे संदीप बांदेकर इच्छुक

NIKHIL_N

गणेशोत्सव नियोजनाचे प्रशासनाला आदेश

NIKHIL_N
error: Content is protected !!