Tarun Bharat

जिल्हय़ात नव्याने 84 पॉझिटिव्ह रुग्ण

मार्चमध्ये 680 रुग्ण, दहाजणांचा मृत्यू : सक्रिय रुग्णसंख्या 434

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली असून बुधवारी एकाच दिवशी 84 कोरोना रुग्ण आढळले. कोरोनाने आणखी एका रुग्णाचा बळी गेला आहे. गेल्या चार महिन्यांत रुग्णवाढीचा वेग मंदावला होता. मात्र, मार्च महिन्यात तो वाढल्याने एका महिन्यात 680 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर दहाजणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.

मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वर्षभरात ऑगस्ट, सप्टेंबर, आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात कोरोनाचा उदेक झाला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2020 पासून कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला व कोरोना नियंत्रणात आला. परंतु वर्षपूर्तीनंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. जिल्हय़ात त्याचे परिणाम जाणवू लागले असून कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढू लागले आहेत.

मार्च महिन्यात 680 रुग्ण, दहाजणांचा मृत्यू

मार्च महिना सुरू होण्यापूर्वी जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 442 होती, ती आता 7 हजार 122 पर्यंत वाढली आहे. त्यामुळे एका महिन्यात 680 रुग्ण वाढले आहेत. तसेच 173 जणांचा मृत्यू झाला होता. महिनाभरात दहाजणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने बळी जाणाऱया रुग्णांची संख्या 183 वर गेली आहे, तर 149 सक्रिय रुग्णसंख्या होती, ती 434 पर्यंत वाढली आहे.

 एकाच दिवशी 84 रुग्ण आढळले

शिमगोत्सवासाठी जिल्हा बाहेरून येणाऱया लोकांची संख्या वाढल्याने कोरोना रुग्णही वाढू लागले आहेत. बुधवारी तर एकाच दिवशी 84 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 122 झाली आहे. तसेच बुधवारी बरे झालेल्या 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत  एकूण 6 हजार 499 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आणखी एकाचा बळी

देवगड तालुक्मयातील 80 वषीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. जिल्हय़ात आतापर्यंत 183 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 434 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्हय़ातील सद्यस्थिती : बुधवारचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 84, सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण 434, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण सहा, बरे झालेले रुग्ण 6,499, मृत झालेले रुग्ण 183, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 7,122. चिंताजनक रुग्ण सहा.

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 571, दोडामार्ग – 378, कणकवली –  2138, कुडाळ – 1547, मालवण – 677, सावंतवाडी – 950, वैभववाडी – 230, वेंगुर्ले – 597, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 34.

तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 78, दोडामार्ग -11, कणकवली – 93, कुडाळ – 58, मालवण – 60, सावंतवाडी – 65, वैभववाडी – 32,  वेंगुर्ले – 33, जिल्हय़ाबाहेरील – 4.

तालुकानिहाय मृत्यू : देवगड – 13, दोडामार्ग – 5, कणकवली – 48, कुडाळ – 35, मालवण – 19, सावंतवाडी – 43, वैभववाडी – 9, वेंगुर्ले – 10, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – एक.

आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट टेस्ट रिपोर्टस् : तपासलेले नमुने बुधवारी 346, एकूण 42,017. पॉझिटिव्ह आलेले नमुने 4843.

ऍन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने : बुधवारी 176, एकूण 30,305 पैकी पॉझिटिव्ह 2,385. तसेच बुधवारी पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात सहा रुग्ण आहेत.

Related Stories

चौथा पॉझिटिव्ह, मुंबईहूनच आलेला

NIKHIL_N

मंडणगडात अडीच हजार नागरिकांना स्थलांतराचे आदेश

Patil_p

आंबा, काजू, मच्छी निर्यात वृध्दीसाठी ‘ऍक्शन प्लॅन’

Patil_p

याकूब बाबा दर्ग्याचे रुपडे पालटणार

Archana Banage

आता डी-मार्टमध्ये केवळ घरपोच सेवा सुरू राहणार!

Patil_p

कोकण मार्गावर आणखी एक फेस्टिवल स्पेशल धावणार

Patil_p