Tarun Bharat

जिल्हय़ात नुतन 32 एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती

Advertisements

पुढील महिन्यात आणखीन वैद्यकीय इतरेत्तर कर्मचाऱयांची निवड करणार

प्रतिनिधी/ सातारा

 सध्या जिल्हय़ात कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे, त्यामुळे कित्तेक वेळा उपचार देणाऱया वैद्यकीय कर्मचाऱयांचीच संख्या तोडकी पडत आहे. याचीच दखल घेत. आता एकुण नुतन 32 एमबीबीएस डॉक्टरांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी रूग्णालयात उपचारा अभावी रूग्णाचे होणारे हाल थांबणार आहेत.

 यापैकी जिल्हा रूग्णालयात 10 डॉक्टरांची, प्राथमिक आरोग्य केंद्रात 10 डॉक्टरांची व ग्रामीण आरोग्य केंद्र मेढा-2, ग्रामीण आरोग्य केंद्र सोमर्डी-2, ग्रामीण आरोग्य केंद्र वडूज-2, ग्रामीण आरोग्य केंद्र औंध-2, ग्रामीण आरोग्य केंद्र पाटण-2, व ग्रामीण आरोग्य केंद्र ढेबेवाडी-2 एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या आरोग्य यंत्रणेची परिस्थिती पाहता पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात डॉक्टरांची परमनंटपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 सोलापुर, पुणे व सातारा जिल्हय़ात मिळुन एकुण 140 एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी साताऱया जिल्हय़ाकरीता एकुण 32 डॉक्टरांची नेमणुक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील महिन्याच्या दि. 3 ते 4 दरम्यान स्टफ नर्सेसची ही नेमनुक करण्यात येणार आहे. यासंबंधीची परिक्षा दि. 28 फेबुवारी दरम्यान घेण्यात आली होती. त्याअनुशंगाने पुढील निवड करण्यात येणार आहे.

दर्जेदार रूग्णसेवा उपलब्ध होण्यासाठी

 सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर खुप मोठा ताण पडत आहे. त्यामुळे येथे सुसुत्रता आणण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हय़ातील गोरगरीब जनतेला दर्जेदार रूग्णसेवा उपलब्ध व्हावीत यासाठी शासन स्थरावर प्रयत्न सुरू आहेत.

डॉ. संजोग कदम आरोग्य उपसंचालक

आता ग्रामीण रूग्णालयात ही दर्जेदार सेवा

 कित्तेक ग्रामीण रूग्णालयात आरोग्य कर्मचारी नसल्यामुळे संबंधीत भागातील रूग्णांची चांगलीच परवड होत होती. कित्तेकांना उपचाराकरीता शहराचा मार्ग धरावा लागत होता. पण आता मात्र ग्रामीण रूग्णालयात चक्क एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याने आता नागरिकांची परवड थांबणार आहे.

Related Stories

रविवार पेठेतील ते ठिकाण होणार क्लिन क्लिन

Amit Kulkarni

सातारा : स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

Archana Banage

शंभूराजेंच्या मंत्रिपदाने जिह्यात जल्लोष

Patil_p

जिल्ह्यात मान्सुन सक्रीय

Patil_p

जिल्ह्यात आठ नगरपालिकांची सदस्य संख्या वाढली

datta jadhav

जिल्ह्यात 1810 रूग्ण वाढले, विनाकारण फिरणारांची कोरोना टेस्ट

datta jadhav
error: Content is protected !!