Tarun Bharat

जिल्हय़ात बुधवारी 26 कोरोनाबाधित

बेळगाव तालुक्मयातील 16 जणांचा समावेश : रुग्णसंख्येत होतेय वाढ

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना रुग्णांच्या संख्येत कधी घट तर कधी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांत रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, बुधवारी पुन्हा 26 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 16 जणांचा समावेश आहे.

शहर व उपनगरांतील 13 तर ग्रामीण भागातील तीन जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता थंडीला सुरुवात झाली असून रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत देण्यात येत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले असून आता पुन्हा प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.

याबाबत आरोग्य विभागाने सर्व जनतेला आवाहन केले असून प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, असे सांगितले आहे. आतापर्यंत सर्वांनी साथ दिली आहे. तेव्हा यापुढेही कोरोनापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रत्येकाचाच सहभाग असणे गरजेचे आहे. बुधवारी शहरातील श्रीनगर, भाग्यनगर, नाझर कॅम्प वडगाव, शाहूनगर, शिवबसवनगर, वीरभद्रनगर, उद्यमबाग, समर्थनगर, कॅम्प परिसरात रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातही रुग्ण आढळत असून तारिहाळ, मुतगा या गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आता पुन्हा रात्रीच्यावेळी लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

Related Stories

कर्नाटक राज्यातील एसएसएलसी परीक्षेबाबत 4 मे रोजी निर्णय

Tousif Mujawar

माहेश्वरी समाजाचा प्र-वर्गात समावेश करा

Amit Kulkarni

आंबेवाडीत सागर नंद्याळकरांची म्हैस प्रथम

Amit Kulkarni

जर्मनच्या अंध गायिकेच्या आवाज ऐकू येत आहे कांताराचा विराज रुपम….

Rohit Salunke

क.नंदगड बसशेडमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच

Amit Kulkarni

नेहरुनगर येथील केपीटीसीएल कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद

Amit Kulkarni