Tarun Bharat

जिल्हय़ात मंगळवारी 17 कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements

बेळगाव तालुक्मयातील 11 जणांचा समावेश, कोरोना पॉझिटिव्हच्या संख्येत वाढ

@ प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना पॉझिटिव्हच्या संख्येत काहीशी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुन्हा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सोमवारी 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर मंगळवारी जिह्यामध्ये 17 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

जिल्हा प्रशासनातर्फे दिलेली ही आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. कारण खासगी रुग्णालयांमध्ये अनेक जण कोरोनावर उपचार घेताना दिसत आहेत. तेव्हा कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. त्यामुळे आता प्रत्येकानेच पुन्हा काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरोना झाला तरी त्यावर आता पूर्वीपेक्षाही सुधारित उपचारपद्धत आली आहे. मात्र, हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे एकापासून दुसऱयाला या आजाराची लागण होते. एकाच घरामध्ये पाच ते सहा रुग्ण आढळू लागले आहेत. तेव्हा आता प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

कोरोना रुग्ण बरा होताना दिसत आहे. असे असले तरी वयोवृद्ध तसेच विविध आजारांनी त्रस्त असणाऱया रुग्णांची अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. तेव्हा कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव जिल्हा महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर वसलेला आहे. त्यामुळे अधिक दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे. तोंडाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाने वारंवार सांगितले आहे. तेव्हा वाढती आकडेवारी लक्षात घेऊन प्रत्येकानेच याबाबत खबरदारी घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.  

Related Stories

उत्तरप्रदेशात काँग्रेसचे ‘उन्नति विधान’

Patil_p

फार्मइझीने नेमले नवे संचालक

Patil_p

मुख्य निवडणूक आयुक्तांची ‘पर्वत यात्रा’

Patil_p

पेट्रोल-डिझेल दरात किरकोळ कपात

Amit Kulkarni

Mann Ki Baat : पीएम मोदींकडून साताऱ्याच्या प्रवीण जाधव यांचं ऑलिंपिक निवडीबद्दल कौतुक

Abhijeet Shinde

‘ज्ञानवापी’चे 50 टक्के सर्वेक्षण पूर्ण

Patil_p
error: Content is protected !!