Tarun Bharat

जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनाचे 305 नवे रुग्ण

सक्रिय रुग्ण संख्या 1697 वर, महिलेसह दोघांचा मृत्यू, बेळगाव तालुक्मयातील 135 जणांचा समावेश

प्रतिनिधी / बेळगाव

शुक्रवारी जिल्हय़ातील 305 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकूण बाधितांच्या संख्येने 30 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनामुळे महिलेसह दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्ण संख्येने 1697 चा टप्पा पार केला आहे. बाधितांमध्ये बेळगाव तालुक्मयातील 135 जणांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील 12, बेळगाव शहर व उपनगरांतील 123 अशा तालुक्मयातील 135 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी रायबाग तालुक्मयात 48, गोकाक तालुक्मयात 18, खानापूर तालुक्मयातील 12 व अथणी तालुक्मयातील 26 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणे असणाऱया बांधितांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

सांबरा एटीएसमधील आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गणेशपूर, देसूर, हिरेबागेवाडी, बसरीकट्टी, बाळेकुंद्री, कडोली, मण्णिकेरी, पिरनवाडी, टिपूसुलताननगर, एम. के. हुबळी, अनगोळ, आदर्शनगर, भाग्यनगर, आंबेडकरनगर, गुड्सशेड रोड, भांदूर गल्ली, भवानीनगर, कॅम्प, बिम्स् हॉस्टेल, राणी चन्नम्मानगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

रामतीर्थनगर, रुक्मिणीनगर, सदाशिवनगर, शहापूर, समादेवी गल्ली, शाहूनगर, शेट्टी गल्ली, श्रीनगर, शिवबसवनगर, विश्वेश्वरय्यानगर, विजयनगर, विनायकनगर, गोंधळी गल्ली, हनुमाननगर, हिंडाल्को कॉलनी, हिंदवाडी, खासबाग, कुवेंपूनगर, महांतेशनगर, नानावाडी, नेहरुनगर, न्युवैभवनगर, पार्वतीनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

शुक्रवारी बेळगाव तालुक्मयातील एक 36 वषीय युवक व रायबाग तालुक्मयातील 50 वषीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील मृतांचा आकडा 358 वर पोहोचला आहे. तर एकूण बाधितांच्या संख्येने 30 हजार 237 चा टप्पा गाठला आहे. 1 हजार 697 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप 3 हजार 29 जणांचा अहवाल यायचा आहे.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कोरोना महामारी थोपविण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. रेल्वे विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक भास्करराव हे विशेष अधिकारी म्हणून बेळगावात तळ ठोकून आहेत. जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी बैठकांचा सपाटाच सुरू केला आहे. जिह्यात 35 हजार 193 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.

जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 27 हजार 841 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 6 लाख 45 हजार 248 जणांची स्वॅब तपासणी केली आहे. त्यापैकी 6 लाख 8 हजार 941 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिह्यात दिवसेंदिवस सक्रिय रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. तर शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 69 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

Related Stories

खानापूर हायटेक बसस्थानक बांधकामाला सुरुवात

Amit Kulkarni

महापालिका गाळय़ांच्या लिलावाला स्थगिती

Amit Kulkarni

हनीट्रपचा फास, शिकार हमखास

Amit Kulkarni

सीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी अधिक दक्ष रहा

Patil_p

खडकलाट येथे राजू यादव यांचा स्मृतिदिन गांभीर्याने

Patil_p

आंतरराज्य बससेवा केवळ सीमाहद्दीपर्यंतच

Omkar B