Tarun Bharat

जिल्हय़ात सातव्या दिवशीही एसटीची वाहतूक बंद

Advertisements

-प्रवासी वेठीस, 30 कर्मचारी कामावर हजर

प्रतिनिधी/ रत्नागिरी

एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर जिह्यात सातव्या दिवशीही एसटीची वाहतूक बंद राहिल़ी शनिवारी एसटीचे 30 कर्मचारी कामावर हजर झाल्याने संप फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र अन्य कर्मचारी संघटना संपावर ठाम राहिल्याने एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आल़ी दरम्यान एसटीच्या या संपामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहेत.

  एसटी कर्मचाऱयांना पूर्णपणे शासकीय कर्मचाऱयांचा दर्जा द्यावा तसेच विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱयांकडून बंद पुकारण्यात आला आह़े बेमुदत संपामुळे मागील 7 दिवस एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आह़े चालक, वाहक यांच्यासह आस्थापन टायर रिमोल्डींग व वर्कशॉपमधील कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत़ एसटी कर्मचाऱयांकडून पुकारण्यात आलेल्या या संपामुळे जिह्यातील एसटी प्रवाशांचे अतोनात हाल झाल़े शासनाने प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी खासगी वाहतुकीला परवानगी दिली आह़े असे असतानाही खासगी वाहतुकीच्या मर्यादा असल्याने प्रवासी वेठीस धरले गेले आहेत़

जिल्हय़ात साडेचार हजार एसटी फेऱयांना फटका

जिह्यामध्ये एसटीच्या 4 हजार 500 फेऱयांना या संपाचा फटका बसला तर   मागील 7 दिवसांत सुमारे 4 कोटी रूपयांपर्यंत नुकसानीचा फटका एसटीच्या रत्नागिरी विभागाला बसला आह़े कोरोनामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या एसटी प्रशासनाला या संपामुळे नुकसानीला समोर जावे लागत आह़े राज्यभर चालणारा हा संप संपण्याची चिन्ह सध्या दिसून येत नसल्याने आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आह़े  ऐन दिवाळीमध्ये एसटीकडून करण्यात आलेल्या या संपामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

प्रत्येक आगाराच्या ठिकाणी पोलीस तैनात

जिह्यामध्ये एसटीच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱया 27 कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आले आह़े यात रत्नागिरीमधील 18 तर राजापूर आगारातील 9 कर्मचाऱयांचा समावेश आह़े शासनाच्या या कारवाईमुळे शनिवारी 30 कर्मचारी कामावर हजर राहिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जिह्यात खासगी वाहतुकीला अडथळा होवू नये, यासाठी पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आह़े तसेच जिह्यातील प्रत्येक आगाराच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत़

Related Stories

अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार-शर्वाणी  गावकर

Ganeshprasad Gogate

कडाक्याच्या भांडणात सासूचा मृत्यू

Patil_p

विशाळगडावरील बुरुज ढासळला; लोखंडी जिन्यावरील वाहतुक बंद

Abhijeet Khandekar

‘तरुण भारत’ च्या पाठपुराव्याने शुक्रवारपासून चक्रीवादळ भागात सुरू होणार बस सेवा

Abhijeet Shinde

सिंधुदुर्गाची सागरकन्या स्नेहा नार्वेकर हिने केला विश्वविक्रम

Ganeshprasad Gogate

राजापुरातील टंचाई आराखडय़ातील 9 नळपाणी योजनांच्या कामाला ब्रेक

Patil_p
error: Content is protected !!