Tarun Bharat

जिल्हय़ात सुरू झाला नवरात्रोत्सवाचा जागर

394 ठिकाणी सार्वजनिक , 70 ठिकाणी खासगी देवींची प्रतिष्ठापना

प्रतिनिधी/ रत्नागिरी

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची धूम सोमवारपासून सुरू झालेली आहे. जिह्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुमारे 394 सार्वजनिक 70 वैयक्तिक देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना मोठय़ा भक्तिभावात करण्यात आली. गावोगावी देवीच्या मंदिरातून या नवरात्रोत्सवाच्या जागराला प्रारंभ झालेला आहे.

 कोरोनामुळे मागील दोन वर्षे रास-गरबा नृत्यावर बंधने होती. मात्र यंदा तरुणाई नेहमीच्या पध्दतीने थिरकण्यास सज्ज झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून असलेले पावसाचे सावट मात्र घटस्थापनेच्या दिवशी नाहीसे झालेले होते. रविवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भक्तांनी सुस्कारा सोडला. यादिवशी सायंकाळी विविध मंडळांनी देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापना करायच्या ठिकाणी वाजतगाजत नेण्यास सुरुवात केली होती. सोमवारी सकाळपासूनच घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीच्या आगमनाच्या  भव्य मिरवणुका शहर व गावोगावी काढण्यात आल्या होत्या.

 देवींच्या मूर्ती मंडळाच्या सजावट केलेल्या मंडपाच्या ठिकाणी आणून तर मंदिरांमध्येही शास्त्राsक्त पध्दतीने पूजा करुन प्रतिष्ठापना करण्यात आली. ठिकठिकाणी मंडपांच्याठिकाणी आकर्षक सजावट आणि करण्यात आलेली रोषणाई साऱयांचे लक्ष वेधून घेत आहे. यंदा तरुणाईचा उत्साह अधिक दिसत आहे. काही मंडळातर्फे स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत.     

घरोघरीदेखील घट बसविण्यात आले आहेत. त्यात ओले आणि सुके घट बसवण्याची प्रथा आहे. त्याशिवाय काही ठिकाणी केवळ फोटोची प्रतिष्ठापना करुन नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. जिह्यातील रत्नागिरी शहरातील भगवती देवी, आडिवरे येथील महाकाली, चिपळूणची विंध्यवासिनी देवी, तुरंबव शारदादेवी, वरदायिनी देवीच्या मंदिरात मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.

Related Stories

कारवाई करुनही गुरे वाहतूक थांबता थांबेना!

Patil_p

खासगी रुग्णालयांत दरपत्रकासाठी आग्रह

NIKHIL_N

दापोलीत अद्याप 44 शाळा बंद

Archana Banage

रत्नागिरी : साठ लाखांच्या लूटप्रकरणी आणखी ५ ताब्यात

Archana Banage

सेंट्रल वॉटर पॉवर ऍण्ड रिसर्च कमिटीकडून नदीची पाहणी

Patil_p

शेळीगट योजनेचे 330 लाभार्थी हवालदील

NIKHIL_N