Tarun Bharat

जिल्हय़ात 106 रुग्ण झाले कोरोनामुक्त

मंगळवारी 51 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. असे असले तरी अजूनही याबाबत दक्षता घेणे काळाची गरज आहे. कोरोनामुळे मंगळवारी तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत 863 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद सरकार दरबारी आहे. मंगळवारी जिल्हय़ात 106 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 51 नवे रुग्ण आढळले आहेत.

जिल्हय़ात आतापर्यंत 78 हजार 37 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामधील 76 हजार 570 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 604 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. कोरोनाचा आकडा कमी होत आहे. ही बाब दिलासादायक असली तरी अजूनही प्रत्येकाने याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मंगळवारी भाग्यनगर, क्लबरोड, खासबाग, हनुमाननगर, कडोलकर गल्ली, अंजनेयनगर, कुमारस्वामी लेआऊट, साईनगर-वडगाव, श्रीनगर, टिचर कॉलनी-खासबाग, टिळकवाडी, वैभवनगर, मुचंडी, मुतगा, काकती, गणेशपूर या ठिकाणी कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. बेळगाव तालुक्मयात 25 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील चौघांचा तर शहरी भागातील 21 जणांचा समावेश आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Stories

बसवाण गल्ली डेनेज समस्या जैसेथे

Amit Kulkarni

स्वरमल्हार फौंडेशनतर्फे आज शास्त्रीय गायन

Amit Kulkarni

काळादिन ‘मेसेज’ खटला लांबणीवर

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटी-लोककल्प फौंडेशनतर्फे सामाजिक उपक्रम

Omkar B

जंगल सफारीसाठी वाढतोय जनतेचा प्रतिसाद

Amit Kulkarni

मनपा कर्मचाऱयांकरिता कार्यालयात लस उपलब्ध

Amit Kulkarni