Tarun Bharat

जिह्यातील 589 जणांचे अहवाल निगेटिव्ह

प्रतिनिधी / बेळगाव :

गेल्या 24 तासांत बेळगाव शहर व जिह्यातील 589 संशयितांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने गुरुवारी रात्री जारी केलेल्या बुलेटीनमधील माहितीनुसार प्रशासनाला आणखी 1411 अहवालांची प्रतिक्षा आहे. एक, दोन दिवसांत हे अहवाल उपलब्ध होणार आहेत.

बुधवारच्या बुलेटीनमधील माहितीनुसार लॅबमध्ये आणखी 2 हजार स्वॅब तपासणी व्हायची होती. त्याचा अहवालही प्रलंबित होता. यापैकी 589 अहवाल निगेटिव्ह आले असून महाराष्ट्रासह वेगवेगळय़ा राज्यातून आलेल्या आणखी 1411 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

बुधवारी बेळगाव शहर व तालुक्मयातील बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये नेहरुनगर, कुंतीनगर, मार्कंडेयनगर, अतिवाड परिसरातील बाधितांचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये या बारा जणांचा समावेश आहे.

धारवाडहून बेळगावला आलेल्या 24 वषीय तरुण वगळता 27 वषीय महिला, 24 वषीय महिला, 40 वषीय महिला, 37 वर्षीय महिला, 18 वषीय तरुणी, 49 वषीय पुरुष, 25 वषीय तरुण, 68 वषीय वृध्द, 16 वषीय मुलगी, 58 वषीय महिला व 21 वषीय तरुण या महाराष्ट्रातून आलेल्या बारा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या सर्व बारा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पूर्वी बाधितांवर 14 दिवस विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत होते. बाराव्या दिवशी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येत होते. 48 तासांत दोनवेळा जर अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी पाठविण्यात येत होते. आता 10 दिवसांत स्वॅब तपासणी करुन अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी पाठविण्यास आरोग्य विभागाने परवानगी दिली आहे.

जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जिह्यातील 14 हजार 555 जणांच्या आरोग्यावर लक्षठेवण्यात आले आहे. 5 हजार 433 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. परराज्यातून येणाऱया चाकरमान्यांची संख्या वाढल्यामुळे सहाजिकच क्वारंटाईनची संख्या वाढली आहे.

जिह्यातील 13 हजार 259 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले असून यापैकी 11 हजार 442 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 216 जणांचा अहवाला पॉझिटिव्ह आला आहे.आतापर्यंत 126 जण कोरोनामुक्त झाले असून 97 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.

Related Stories

कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यावर पुन्हा खोदाई

Omkar B

नियमांचे काटेकोर पालन करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

Amit Kulkarni

‘भरतनगरी’ कादंबरीतील‘तो’ उल्लेख चुकीचा

Amit Kulkarni

बेळगावकरांचा जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरूच

Amit Kulkarni

पोस्टमन चौकातील खड्डय़ांकडे दुर्लक्ष

Patil_p

दहावीतील गुणवंतांचा वेदांत फौंडेशनतर्फे सत्कार

Amit Kulkarni