Tarun Bharat

कोल्हापूर जिह्यात आणखी १७ रुग्णांची भर

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. रविवारी दिवसभरात जिह्यात १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी ३ रुग्ण शहरातील आहेत. रंकाळा टॉवर परिसरात १, लक्ष्मीपुरी येथील बागवान गल्लीमध्ये दोघे रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. उर्वरित सहा रुग्ण हातकणंगले, इचलकरंजी, पन्हाळा, चंदगड येथील आहेत.

जिह्यात रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३ रुग्ण, रेंदाळ येथील १, पन्हाळा तालुक्यातील आंबवडे येथील १, इचलकरंजी येथील चंदूर रोड व बालाजीनगर येथील प्रत्येकी एक तर चंदगड येथील अडकूर परिसरातील दोघांचा समावेश आहे.परजिह्यातून जिह्यात दाखल झालेल्या १२०७ जणांची रविवारी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३५५ जणांचे स्वॅब घेतले आहेत. रविवारी रात्री १० वाजेपर्यंत जिह्यात १७ रुग्णांची भर पडल्याने जिह्यातील एकूण रुग्णसंख्या ८२३ वर पोहोचली. रविवारी दिवसभरात एका रुग्णास डिस्चार्ज दिल्याने जिह्यातील एकूण कोरोनामुक्तांची आकडेवारी ७१४ वर पोहोचली आहे. तर अद्यापही ९९ रुग्ण सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. आजपर्यंत जिह्यातील १० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात ३८८ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३६७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. अद्याप १५ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.

शहरात धोका वाढला
शहरात रविवारी नव्याने तीन रुग्णांची भर पडली. यामध्ये रंकाळा टॉवर परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बोंद्रेनगर येथील एका पॉझिटिव्ह महिलेच्या माहेरच्या दोघा नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बोंद्रेनगर येथील ती पॉझिटिव्ह महिला लक्ष्मीपुरी येथील बागवान गल्लीमध्ये माहेरी नातेवाईकांना भेटण्यासाठी गेल्याचे समोर आले होते. यानंतर त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी
आजरा ७८, भुदरगड ७५,
चंदगड ८३, गडहिंग्लज १००,
गगनबावडा ७, हातकणंगले १६,
कागल ५७, करवीर २५,
पन्हाळा २९, राधानगरी ६८,
शाहूवाडी १८४, शिरोळ ८,
नगरपालिकाक्षेत्र ३३, महापालिका ४४,
परराज्य किंवा जिल्हे १३

Related Stories

कोल्हापूर : जीव धोक्यात घालून वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

Archana Banage

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा हक्क मिळावा

Archana Banage

आजऱ्यात शिवसैनिक आक्रमक; प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Khandekar

पन्हाळा – बुधवारपेठ रस्त्यावर दरडीतील दगड कोसळल्याने भितीचे वातवरण

Archana Banage

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्तीच्या हालचाली

Archana Banage

Kolhapur : शिक्षक बँकेच्या नफा विभागणीची होणार चौकशी

Abhijeet Khandekar