Tarun Bharat

जिह्यात आणखी 29 मृत्यू

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यामध्ये मृतांची आकडेवारी सातत्याने वाढतच आह़े मागील 24 तासांत जिह्यामध्ये तब्बल 29 कोरोना मृत्यूची नोंद झाली आह़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 15 जण असूने जिह्यातील मृतांचा आकडा 844 झाला आह़े मंगळवारी नव्याने 622 रूग्णांची वाढ झाली आह़े  मृत्यू आणि रुग्णवाढ या दोन्ही बाबतीत रत्नागिरी तालुकाच हॉटस्पॉट बनत चालल्याचे गेल्या काही दिवसातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

 जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार, 29 मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 15  चिपळूण 3 ,खेड 7, संगमेश्वर 2, दापोली 1 व गुहागरातील 1 रूग्णांचा समावेश आहे. रत्नागिरी जिह्यात मागील 24 तासांत 622 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़  यामध्ये एकटय़ा रत्नािगरी तालुक्यातील 362 रूग्णांचा समावेश आह़े  जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 27 हजार 893 पर्यंत पोहोचली आह़े  मंगळवारी आरटीपीसीआर चाचणीमध्ये 196 तर ऍन्टीजेन चाचणीमध्ये 225 तर आधीचे 201 अशी कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आल़ी यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 362 दापोली 12, खेड 14, गुहागर 27, चिपळूण 89, संगमेश्वर 46,  लांजा 56 व राजापूर 16 रूग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

मालवण-कुंभारमाठ येथील उत्तम फोंडेकर यांना प्राईम अँग्रीकल्चर अवॉर्ड प्रदान

Anuja Kudatarkar

उपाययोजनांवर अंमलबजावणी करा!

NIKHIL_N

आमदार राजन साळवींच्या घरासह हॉटेलचीही मोजणी

Patil_p

डॉ.आंबेडकरांना एकाच जातीत बांधता येत नाही!

NIKHIL_N

गुरे शेतात शिरल्याने दोन गटांत मारामारी

Patil_p

पंधरा दिवसानंतरही 60 टक्के दापोली अंधारात!

Patil_p
error: Content is protected !!