Tarun Bharat

जिह्यात आतापर्यंत सव्वा टक्काच लोकांना कोरोनाची बाधा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आतापर्यंत जिह्याच्या लोकसंख्येचा विचार करता सव्वा टक्काच लोकांना कोरोनाची बाधा झाली आह़े  17 लाख लोकसंख्या असलेल्या जिह्यात 1 वर्षानंतर कोरोनाबाधितांची संख्या 20 हजाराच्या जवळपास आह़े केवळ सव्वा टक्का लोकांच्या बाधित होण्याने जिल्हय़ाची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आह़े

 मागील अनेक वर्षात लोकप्रतिनिधींनी आरोग्याच्या सुविधा सुधारण्यावर भर दिला तर आज ही वेळ आली नसत़ी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आरोग्य सुविधा कोलमडण्यामागचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आह़े भविष्यात या गोष्टींकडे विशेष दिले जाईल, अशी अपेक्षा रत्नागिरीकर व्यक्त करत आहेत़  मंगळवारी जिह्यात तब्बल 662 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल़े तर 12 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े

  जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी 1 हजार 113 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 325 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 337 अशा एकूण 662 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आल़ी यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 153, दापोली 62, खेड 56, गुहागर 132, चिपळूण 94, संगमेश्वर 81, मंडणगड 00, लांजा 34 व राजापूर 50 असे रूग्ण आढळून आल़े  यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आता 20 हजार 278 इतकी झाली आह़े

मागील 24 तासात 497 रूग्ण बरे होवून घरी सोडण्यात आल़े  यामुळे बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 659 इतकी आह़े  तर जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 67.35 इतके आह़े तर जिह्यामध्ये नव्याने 12 मृत्यूंची नोंद करण्यात आल़ी  यामध्ये मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 1, संगमेश्वर तालुक्यातील 6,  चिपळूण 1, राजापूर 1, गुहागर 1, खेड 2 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा  जिह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार रत्नागिरी 148, खेड 80, गुहागर 24, दापोली 62, चिपळूण 125, संगमेश्वर 93, लांजा 29, राजापूर 39, मंडणगड 6 अशी नोंद आहे. जिह्यातील एकूण मृतांची संख्या 606 इतकी पोहोचली असून मृत्यूदर 2.98 इतका आह़े

 जिह्यातील 10 टक्के लोकांचे लसीकरण

रत्नागिरी जिह्यात 27 एप्रिलपर्यंत 1 लाख 52 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले आह़े म्हणजेच 10 टक्के लोकांचे लसीकरण झाले आह़े  यामध्ये बहुतांश हे पहिली लस घेतलेले आहेत़ लसींचा तुटवडा असतानाही लसीकरणाला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद लाभत आह़े

Related Stories

इनरव्हील क्लबच्यावतीने आरोग्य व कॅन्सरबाबत अवेअरनेस कॅम्प

Anuja Kudatarkar

रेडी येथील नवविवाहितेचा प्रसुती पश्चात मृत्यू

NIKHIL_N

रत्नागिरी : तौक्ते वादळाचा संगमेश्वर तालुक्यातील घरांना सर्वाधिक फटका

Archana Banage

‘कोरोना’साठी पुन्हा कठोर निर्बंध

NIKHIL_N

रत्नागिरी : रिफायनरी समर्थनार्थ राजापूर नगरपरिषदेचा ठराव

Archana Banage

..तर समुद्रामध्ये संघर्ष अटळ

Archana Banage