Tarun Bharat

जिह्यात कोरोनाचे तब्बल 23 नवे रूग्ण

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मंगळवारी जिह्यामध्ये कोरोनाचे तब्बल 23 नवे रूग्ण आढळून आले आहेत़  दिवाळीआधी रुग्णसेख्या वेगाने घटत होती. मात्र दिवाळीनंतर रुग्णवाढीचा वेग वाढू लागला आहे. मंगळवारी 23 रूग्णांची वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आह़े दरम्यान 6 कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना मंगळवारी घरी सोडण्यात आल़े  एकाही रूग्णाचा कोरोनापासून मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले.

  जिह्यामध्ये मंगळवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 11 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 12 कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 5 संगमेश्वर 5, गुहागर 2, दापोली 1, मंडणगड 2, लांजा 2 चिपळूण येथे 6 नवे रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 8 हजार 689 झाली आह़े कोरोनापासून बरे झालेल्या 6 रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे बरे झालेल्या रूग्णांची संख्या 8 हजार 206 व प्रमाण 94.44 झाले आह़े 

            शुक्रवारी जिह्यात 20 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर शनिवारी 14 व रविवारी 10 रुग्ण आढळल्याने काळजी वाढली होती. सोमवारी पुन्हा केवळ 3 रुग्ण आढळल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अल्पकाळ ठरला  असून मंगळवारी सोमवारपेक्षा सुमारे 8 पट अधिक रुग्ण आढळल्याने काळजी वाढल्याचे म्हटले जात आहे.

Related Stories

डॉक्टर उद्या नोंदविणार निषेध

NIKHIL_N

राज्यातील समाजकंटक व सायबर गुन्हेगारांवर ३६३ गुन्हे दाखल

Archana Banage

फक्त एकच हाती होतं, ‘देवाचा धावा’

NIKHIL_N

मिलाग्रीस हायस्कूलचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षा निकाल शंभर टक्के

Anuja Kudatarkar

..अखेर ओझर-तिवरे तिठय़ावर सुरक्षादर्शक

Patil_p

दापोलीत पर्यटनक्षेत्र पुन्हा शांत होण्याची शक्यता

Archana Banage
error: Content is protected !!