Tarun Bharat

जिह्यात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू

Advertisements

रविवारी नव्याने 119 रूग्णांची नोंद

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यामध्ये रविवारी आणखी 3 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा मृतांमध्ये चिपळूण येथील 75 वर्षीय, लांजामधील 85 वर्षीय तर खेड तालुक्यातील 56 वर्षीय पुरूषांचा समावेश आह़े  यामुळे जिह्यातील मृतांची संख्या 145 एवढी झाली आह़े  तर रविवारी नव्याने 119 कारोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

या बाबत जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आरटीसीपीआर टेस्टमध्ये 55 तर अँन्टीजेन टेस्टमध्ये 64 रूग्ण असे एकूण 119 रूग्ण मिळून आले आहेत़ यामध्ये रत्नागिरी येथे 59, चिपळूण 19, खेड 24, गुहागर 9, संगमेश्वर 1, लांजा 7 असे रूग्ण आढळून आल़े  जिह्यातील एकूण रूग्णांची संख्या 4 हजार 855 पर्यंत पोहोचली आह़े  यामध्ये उपचारात असलेल्या रूग्णांची संख्या 1 हजार 692 इतकी आह़े 

रविवारी 41 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े जिह्यामध्ये बरे झालेल्यांची एकूण संख्या 3 हजार 18 इतकी झाली आह़े  मात्र कोरोना रूग्णांचा उपचारादरम्यान होणारे मृत्यू प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आह़े यासाठी नागरिकांनी कोणतेही कारोनाची लक्षणे आढळून आल्यास घरगुती उपचार न करता तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आह़े 

Related Stories

शिवभोजन योजनेत बोगस लाभार्थी

Patil_p

हर्णे मध्ये टाटा ७०९ गाडी आगीत खाक

Archana Banage

निजामुद्दीन – एर्नाकुलम एक अतिरिक्त डब्यांची धावणार

Archana Banage

दुचाकीस्वार दरीत कोसळलाय…

NIKHIL_N

काँग्रेसचे अस्तित्व राहिलंय कुठं? राधाकृष्ण विखे पाटलांचे विधान

Anuja Kudatarkar

तीन जिल्हय़ांच्या पर्यटन विकासासाठी 100 कोटी

Patil_p
error: Content is protected !!