नव्याने 98 रूग्ण पॉझिटिव्ह, एकूण मृत 102
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोना बळींची संख्या वाढून आता शंभरी पार झाली आह़े मागील दोन दिवसात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा यामुळे जिह्यातील एकूण मृतांची संख्या 102 इतकी झाली आह़े तर रविवारी नव्याने 98 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत़ जिह्यातील एकूण रूग्णांची संख्या 2 हजार 845 इतकी झाली आह़े
मृतामध्ये रत्नागिरी शहरालगतच्या शांतीनगर येथील 52 वर्षीय कोरोना रूग्णाचा मृत्यू झाल़ा तर गेल्या 24 तासात अन्टीजेन चाचणीत 91 तर आरटीपीसीआर चाचणीत 7 असे 98 रूग्ण आढळून आल़े यामध्ये रत्नागिरीत 36, कळंबणी 4, कामथे 45, घरडा येथे 13 असे रूग्ण मिळून आले आहेत़ तर 28 बरे झालेल्या रूग्णांना रविवारी घरी सोडण्यात आल़े जिह्यातील बरे झालेल्यांची संख्या आता 1 हजार 816 इतकी झाली आह़े जिह्यातील प्रयोगशाळांमध्ये करण्यात येत असलेल्या चाचण्यात वाढ करण्यात आली आह़े प्रतिदिन 179 वरून 249 पर्यंत चाचण्यात वाढ करण्यात आली आह़े रविवारपर्यंत जिह्यात आतापर्यंत 22 हजाराहून अधिक जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 845 अहवाल पॉझिटिव्ह तर 18 हजार 976 अहवाल निगेटिव्ह आले आहेत़
खेडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या उंबरठय़ावर
खेड: शनिवारी रात्री प्राप्त अहवालानुसार आणखी 13जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून कोरोनाबाधितांची संख्या 500च्या उंबरठय़ावर येऊन ठेपली आहे. कोरोनाबाधितांमध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्यासह एका पोलीस कर्मचाऱयाचाही समावेश आहे. लवेल येथील घरडाच्या ऍन्टीजन चाचणीत 10 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांमध्ये शहरातील तिघांसह पिरलोटे 5, जामगे, बोरज, रजवेल येथील प्रत्येकी 1 व असगणीतील 2 रूग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 498वर जावून पोहोचली आहे. आतापर्यंत 361जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोना बळींची संख्या 14 वर पोहोचली आहे.
दापोलीत तीन कोरोना रूग्ण
मौजे दापोली: दापोली तालुक्यात रविवारी प्राप्त झालेल्या एकूण 43 अहवालापैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पिसई, दापोली, जालगाव या तीन ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडल्याची माहिती दापोली तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे. ज्या भागात रुग्ण सापडत आहेत, त्या ठिकाणी त्या कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना राहत्या घरीच क्वारंटाईन केले जात असून त्यांची तपासणी केली जात आहे.