Tarun Bharat

जिह्यात कोव्हॅक्सीन लसीचा तुटवडा

चार दिवसांपासून दुसरा डोस

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिह्यात दि.16 जानेवारीपासून सातारा जिह्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. जिह्यातील लसीकरण केंद्रावर दररोज दोनशे जणांना लस दिली जात होती. आता लसीकरणाचा वेग वाढवला गेला आहे. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून सातारा जिह्यात सुरवातीला आलेल्या कोव्हॅक्सीन या लसीची मात्रा काहीजणांनी घेतली होती. त्यांना पुन्हा दुसरा डोस 28 दिवसांनंतर घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु जिह्यात कोव्हॅक्सीनची लसच मिळत नाही. तुटवडा असून या लसीची मागणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

 सातारा जिह्याची लोकसंख्या सुमारे 35 लाख एवढी आहे. कोरोनाची दाहकता वाढत चालली असल्याने केंद्र शासनाने केलेल्या आवाहनानुसार कोरोनावरील लसीकरणाने वेग घेतला आहे. शासनाने दोन प्रकारच्या लसी आणल्या. त्यामध्ये कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन. सध्या जिह्यात कोव्हिशिल्ड लसीचे 59 हजार डोस  दोन दिवसांपूर्वी आले होते. मात्र, ज्यांनी पहिला डोस कोव्हॅक्सीनचा घेतला होता. त्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस घेणे अपेक्षीत होते. परंतु लसच उपलब्ध नसल्याने दुसरा डोस ज्यांचा आला आहे ते चिंतेत आहेत. त्या लसीच्या कंपनीने 28 दिवसांनतर लसीचा दुसरा डोस घ्या असेच सांगितले आहे. आतापर्यत जिह्यात 2 लाख जणांना लसीकरण करण्यात आले. 45 वर्षावरील 8 लाख लोक आहेत. त्या लोकांना दोन डोस म्हणजे 16 लाख लसीची मात्रा लागणार आहे. त्यामुळे जिह्यात कोव्हॅक्सीनची लस कधी येईल याकडे सगळय़ांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

मागणी केली ओ.

कोव्हॅक्सीन या लसीबाबत अठावीस दिवसाचा नियम आहे. त्यांनी तीच लस घ्यायला पाहिजे. त्याकरिता आम्ही त्या लसीची मागणी केली आहे. शासनाकडून लवकरच उपलब्ध होईल.

Related Stories

सांगलीतील लाचखोर शिक्षणाधिकारी आणि अधीक्षक निलंबित

Abhijeet Khandekar

धोकादायक : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 22,818 वर

Tousif Mujawar

सातारा : ‘माझे कुटुंब माझे जवाबदारी’चे उदिद्ष्ट आरोग्याविषयी जनजागृती करणे : प्रांत मिनाज मुल्ला

Archana Banage

जिल्ह्यात शाळा सुरु करण्याच्या हालचाली

datta jadhav

सोलापुरात आज कोरोनाचे सात बळी, संख्या सहाशे पार

Archana Banage

सातारा : बनावट सोने प्रकरण; आठ परप्रांतीयांची टोळी जेरबंद

datta jadhav