Tarun Bharat

जिह्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढतेय; 45 नवे रुग्ण

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव शहर व जिह्यात कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत आहे. शनिवारी जिह्यात 45 नवे रुग्ण आढळून आले असून यामध्ये एका बेळगाव तालुक्मयातील 31 जणांचा समावेश आहे. हालभांवी येथील आयटीबीपीचे 8 जवान, सांबरा एकरफोर्समधील एका जवानाला कोरोनाची बाधा झाली आहे तर वेगवेगळय़ा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱया तीन  विद्यार्थ्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बेळगाव शहर व उपनगरात 20 व ग्रामीण भागात 11 असे तालुक्मयातील 31 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 616 वर पोहोचली असून आतापर्यंत 341 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 हजार 994 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 281 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

अद्याप 2 हजार 985 स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. तर 34 हजार 487 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आरोग्य विभागाने आतापर्यंत 2 लाख 83 हजार 614 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 2 लाख 53 हजार 473 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. थंडीमुळे रुग्ण संख्या वाढणार असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

गणेशपूर, खादरवाडी, भाग्यनगर, शिवबसवनगर, हिंडाल्को, टिळकवाडी, रामतीर्थनगर, खासबाग, माविनकट्टी, राणी चन्नम्मानगर, श्रीनगर, काकतीवेस, शहापूर, हिंडलगा परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. खासगी इस्पितळातील एका 36 वषीय डॉक्टरालाही कोरोनाची लागण झाली आहे. प्राध्यापकांपाठोपाठ वेगवेगळय़ा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Related Stories

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मनान सुभेदारचे यश

Amit Kulkarni

राधिका ज्युल्या यांना तीन सुवर्णपदके

Amit Kulkarni

वाहतूक कोंडीमुळे व्यापारी-नागरिक त्रस्त

Omkar B

प्राण्यांसाठी ब्लडबॅग द्या

Amit Kulkarni

गोवावेस येथे हजारो लिटर पाणी वाया

Patil_p

बारमध्ये खेळण्यातील नोटा खपविण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni