Tarun Bharat

जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता वाटत नाही

गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे प्रतिपादन, पूर्वीच्या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घ्याव्या लागणार

प्रतिनिधी/ रत्नागिरी

केंद्र व राज्य सरकारकडून कोरोनाविषयी प्रतिबंधात्मक जीवनपद्धतीविषयी सूचना येत आह़े जिल्हास्तरावर लॉकडाऊनसाठी खास आदेश पुन्हा रत्नागिरीचे जिल्हाप्रशासन काढेल, असे वाटत नाह़ी गेल्यावेळी जिल्हास्तरावरील वाढीव लॉकडाऊनवर उठलेल्या तीव्र प्रतिक्रिया प्रशासन लक्षात ठेवेल, असा विश्वास गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केल़ा

ते म्हणाले, यापूर्वी जिल्हा प्रशासनाने 1 ते 8 जुलैदरम्यान जिल्हास्तरीय खास लॉकडाऊन घोषित केला होत़ा या निर्णयापूर्वी सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, ग्राहक, सामान्य नागरिक अशा सर्वांशी चर्चा करून हा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया त्यावेळी दिली होत़ी  यानंतर जिल्हा प्रशासनाने 9 ते 15 जुलैदरम्यान लॉकडाऊन वाढवण्याचे आदेश काढल़े ते पुढे म्हणाले, लॉकडाऊन वाढीच्या आदेशानंतर जिह्यात सगळीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्य़ा लोकांशी न बोलता एकतर्फी करण्यात आलेल्या आदेशांविरूद्ध सामान्य लोकांनी खूप मोठय़ा प्रतिक्रिया व्यक्त केल्य़ा या प्रतिक्रियांची दखल जिल्हा प्रशासनाला घ्यावीच लागल़ी 9 ते 15 जुलैचा लॉकडाऊन जवळपास मागे घ्यावा लागला होत़ा  आमदार जाधव यांनी पुढे सांगितले की, यापूर्वी खास लॉकडाऊनसंदर्भात जिह्यात ठिकठिकाणाहून उमटलेल्या प्रतिक्रिया लक्षात घेतल्या जातील़ जिल्हा प्रशासन पुन्हा जिल्हास्तरीय लॉकडाऊनचा विचार करणार नाहीत, असे आपल्याला वाटत़े

Related Stories

मालवण येथे २० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु

Anuja Kudatarkar

राजापूर पोलिसांनी बारा तासाच्या आत लावला खुनाचा छडा

Patil_p

कर्नाटकातील दीड हजार मजूर स्वगृही रवाना

NIKHIL_N

आचरा ग्रामपंचायत कडून बचतगटाला मोफत हळदीचे वाटप

Anuja Kudatarkar

नेमळे ग्रामदैवत श्री देवी सातेरी देवस्थानचा जत्रौत्सव १६ नोव्हेंबरला

Anuja Kudatarkar

ई-पास ची ‘खिरापत’ वाढवतेय पॉझिटिव्हचा धोका

NIKHIL_N