Tarun Bharat

जिल्ह्यात मान्सुन सक्रीय

पश्चिम भागात जोर, पूर्व भागात नुसते ढगाळ वातावरण

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनला बुधवारी सकाळपासून प्रारंभ झाला आहे. पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्याचे तर पूर्व  भागात नुसतेच ढगाळ वातावरण होते. जिह्यातील पेरण्यानी वेग घेतला असून सुमारे 35 टक्के पेरण्या उरकल्या असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. दरम्यान खताचा तुटवडा असल्याने शेतकऱयांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बुधवारी महाबळेश्वर, जावली, पाटण, वाई, सातारा या तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु होती. खंडाळा, खटाव, माण आणि कोरेगाव या दुष्काळी तालुके कोरडे ठणठणीत होते. 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार तौक्ते वादळ जिह्यात आले होते. त्यावेळी जो पाऊस झाला होता. त्याच पावसानंतर जिह्यातील शेतकऱयांनी पेरणीच्या कामांना काही ठिकाणी प्रारंभ केला होता. त्यानंतर पावसाची उघडझाप सुरु होती. बुधवारी मात्र जिह्यात मान्सुनने सकाळपासून सक्रीयपणे सुरुवात केली. वाई, महाबळेश्वर, जावली, सातारा, पाटण या तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु झाली होती. काही ठिकाणी सुरु असलेल्या पावसाने शेतात सुरु असलेल्या पेरण्यामध्येच बंद ठेवाव्या लागल्याचे चित्र दिसत होते. सातारा शहरात सकाळपासून तुरळक सरी पडत होत्या. शहरातील मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी पावसामुळे धांदल उडाली होती. बाजारपेठेत पदपथ विप्रेंत्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत होते.

बुधवारी सकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे सातारा तालुक्यातील परळी, ठोसेघर भागात असलेले झरे खळखळून वाहत होते. फेसाळणारा ठोसेघरचा धबधबा वाहत होता. उरमोडी धरणाच्या परिसरात पावसाच्या सरीवर सरी पडत असल्याचे निसर्गरम्य चित्र दिसत होते. कण्हेर, कंळबे, लिंब, सोनगाव, क्षेत्रमाहुली आदी गावांमध्ये मान्सूनचा पाऊस सुरु झाल्याने शेतकऱयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, दुष्काळी खटाव, माण, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यात नुसतेच ढगाळ वातावरण दिसत होते. दरम्यान, जिह्यात 35 टक्के पेरण्या झाल्या असून रासायनिक खतांची टचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Stories

गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्हचा शतकी आकडा पार

Archana Banage

नवनीत राणा दाखल करणार अरविंद सावंतांविरुद्ध गुन्हा

Archana Banage

सातारा : रुग्णालयांतील बेडची उपलब्धता एका क्लिकवर कळणार

Archana Banage

रेशनकार्डवरील धान्य पुरवठा यादी ग्रामपंचायतीच्या नाववार देणे आवश्यक

Archana Banage

दोन पथके रवाना तरी ‘बाळु’ सापडेना

Patil_p

‘महाविकास आघाडी म्हणजे महावसूली आघाडी’

Archana Banage
error: Content is protected !!