Tarun Bharat

जिह्यात रूग्ण संख्येत घट, मृत्यूची चिंता कायम

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

 जिह्यामध्ये सोमवारी कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये निम्म्याने घट पहावयास मिळाल़ी  जिह्यामध्ये मागील 24 तासात 259 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ मात्र मृत्यूचे वाढते प्रमाण आरोग्य यंत्रेणेची चिंता वाढविणारे ठरत आहेत़ सोमवारी तब्बल 15 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल़ी खेडमधील सर्वाधिक 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आह़े

=    जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी   आरटीपीसीआर टेस्टमध्ये 148 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 111 असे एकूण 259  कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आल़ी  यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 53 दापोली 43, खेड 22, गुहागर 4, चिपळूण 63, संगमेश्वर 54, मंगणगड 0, लांजा 5 व राजापूर 15 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या आता 15 हजार 889 इतकी झाली आह़े

 मागील 24 तासांत 15 कोराना पॉ†िझटिव्ह रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आह़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 70 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 49 वर्षीय महिला व 49 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा तर खेडमधील 81 वर्षीय पुरूष, 53 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय पुरूष, 57 वर्षीय पुरूष, 77 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय पुरूष, गुहागरमध्ये 40 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरूष तसेच राजापूरमध्ये 64 वर्षीय पुरूष व चिपळूणमध्ये 64 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा   जिह्यातील एकूण मृतांची संख्या 464 इतकी पोहचली असून  मृत्यूदर 2.92 इतका आह़े

Related Stories

सिंधुदुर्गनगरीतून धावली तिसरी विशेष रेल्वे

NIKHIL_N

सिंधुदुर्गात अवैध पद्धतीची स्पिअर फिशिंग मासेमारी

NIKHIL_N

हेल्मेट सक्तीआधी जागरुकता निर्माण करा

Patil_p

पॉझिटिव्ह रुग्णसेवा नातेवाईकांकडूनच

NIKHIL_N

शेतकरी ते ग्राहक साखळीसाठी ‘विकेल ते पिकेल’ योजना

Patil_p

रत्नागिरी : आरवली येथील अपघातात दुचाकी चालक ठार

Archana Banage
error: Content is protected !!