Tarun Bharat

जिह्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ऍक्शन घ्या

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश, नाईट पेट्रोलिंग वाढवले

प्रतिनिधी/ सातारा

जे जिह्यात पाच खून झाले आहेत. ते गँगवारमधून वा टोळीयुद्धातून झालेले नाहीत.पाचीच्या पाची खुनामध्ये सर्वच्या सर्व आरोपी अटक केलेली आहेत. कोणीही आरोपी मिसिंग नाही. कोणीही आरोपी फरारी नाही. कॉज ऑफ मर्डर कोणत्या कारणासाठी खून झाले ते सुद्धा निष्पन्न केले आहेत. आरोपी आमच्या ताब्यात आहेत. कुठल्याही परिस्थितीत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची कार्यवाही सुरु आहे. नाईट पेट्रोलिंग वाढवले आहे. पोलिसांकडून फास्ट ऍक्शन घेण्याचे काम सुरु आहे. जे हिस्ट्रीस्टिर गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत, असे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीवेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे, उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, जिह्यात पाच खुन झाले ही वस्तूस्थिती आहे. या आरोपींचे राजकीय लागेबांधे असतील जर कोणी राजकीय व्यक्ती प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करत असतील तर त्या अँगलने आमचं पोलीस खात तपास करेल. कोणीही कसलीही व्यक्ती असेल तर अशा गुंड प्रवृत्तीला पाठीशी घालत असेल योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहेत. त्यावेळी सलग दोन तीन दिवस बाहेर होतो. मला समजल्यानंतर मी पोलीस अधीक्षकांना आणि रेंज आयजींना तात्काळ आदेश दिलेले आहेत. जिह्यात आजपासून मोठय़ाप्रमाणात नाईट पेट्रोलिंग करतो आहे. मोठय़ा प्रमाणात जिथं आयडेंटीफाईड एरिया आहे. जिथं गुंड प्रवृत्तीची लोकांचा वावर आहे. तिथं मोठय़ा प्रमाणात ऍक्शन घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत. पोलीस दोन तीन दिवसांत कारवाई करतील. जिल्हावासियांनी घाबरण्याचे कारण नाही. पाचही खूनांची ब्रिफींग एसपी मला आज देणार आहेत. या बाबी आटोक्यात आणण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते स्टेप्स आमच्या पोलिसांकडून केलं जाईल. जिल्हावासीयांनी अजिबात घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, बोगस कर्जप्रकरणी शेतकऱयांच्या फसवणूकीप्रश्नी चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांना दिलेले आहेत. तो अहवाल आल्यानंतर कारवाई करु, असे आश्वासन त्यांनी दिले.

विधान परिषदेच्या आमदारकीच्या फायली राजभवनात पडून

प्रा. नितीन बानुगडे पाटील हे आमदार कधी होणार असे छेडले असता आमच्याकडून प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. महामहिम राज्यपाल निर्णय घेतील. प्रस्तावाची फाईल राजभवनात पडून आहे, लवकरच निवड होईल, अशी अपेक्षा मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

पाटखळची तक्रार खरीच आहे

पाटखळच्या तक्रारीबाबत आमदार महेश शिंदे यांना छेडले असता ते म्हणाले, ती तक्रार खरीच आहे. महसूल विभागाने घोळ केला आहे. काही वॉर्ड 700 मतांचे होते ते 288 मताचे केलेले आहेत. काही वॉर्ड हजार मतांचा होता तो साडे तीनशे मतांचा केला. साडेतीन हजार मतदानाच्या गावात ग्रामसेवक, तलाठी आणि सर्कल यांनी घोळ केलेला आहे. हा प्रकार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातला आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केलेली आहे. असे गैरप्रकार मोठया प्रमाणावर झालेले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना करुन, आम्ही पुरावे दिलेले आहेत, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

ग्लोबल टीचर डिसले आता जागतिक बँकेचे सल्लागार

Archana Banage

सहलीच्या बसला बेलवडे हवेली येथे अपघात

Patil_p

गृहराज्य मंत्री ना शंभुराज देसाई यांनी घेतला आढावा

Patil_p

निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक : उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

मरकज कार्यक्रमला गेलेल्या सोलापुरातील 47 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Archana Banage

दारूबंदीच्या जावळी तालुक्यामध्ये पती पत्नीचा अति मद्यप्राशनाने मृत्यू

Archana Banage