Tarun Bharat

जिह्यात 7 हजार चाचण्यांचे लक्ष कोसो दूर

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिह्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत काही केल्या घट होण्याची चिन्हे दिसत नसतानाच  पॉ†िझटिव्हीटी रेट देखील वाढत आह़े यावर मात करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिह्यात दिवसाला किमान 7 हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला दिले होत़े मागील 5 दिवसात दिवसाला सरासरी केवळ 4 हजार चाचण्यांचेच लक्ष गाठण्यात यंत्ररेला यश आले आहे. यामुळे 7 हजार चाचण्यांचे लक्ष दिवा स्वप्नच ठरत असल्याचे म्हटले जात आह़े

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ग्रीन झोनमध्ये असणारा रत्नागिरी जिल्हा दुसऱया लाटेमध्ये मात्र पुरता बेजार झाल़ा जिह्यात गावागावामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आह़े यामुळे रूग्णसंख्येत मोठी वाढ झाल़ी अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागल़ा अधीच व्हेंटिलेटरवर असणारी जिह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या दुसऱया लाटेत कोलमडून पडल़ी अनेकांना उपचार मिळू न शकल्याने आपला जीव गमवावा लागल़ा यामुळे नागरिकांमध्ये देखील संताप व्यक्त होत आह़े

राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉकला सुरूवात केली आह़े पाच टप्प्यामध्ये  अनलॉक करण्याची योजना करण्यात आली आहे. रत्नागिरी जिह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 17 टक्के आह़े सातत्याने वाढणारी रूग्ण संख्या व मृतांचे आकडे यामुळे जिल्हा चौथ्या टप्प्यात गेल़ा जिल्हा प्रशासनाकडून राबविलेल्या विविध उपाययोजना कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्य़ा यामुळे जिह्याला अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन कायम करण्यात आल़ा

  कोरोना रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या होत्य़ा प्रत्यक्षात ‘आयसीएमआर’च्या निर्देशांनुसार एका कोरोना रूग्णांमागे 20 चाचण्या करणे आवश्यक होत़े मात्र जिह्यात प्रत्येक रूग्णामागे जेमतेम 4 ते 5 चाचण्या होत आहेत़ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी जिह्यात दिवसाला 7 हजार चाचण्या करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होत़े त्यानंतर जिह्यात चाचण्यांची संख्या वाढली असली तरीही मागील 5 दिवसांत सरासरी 4 हजारच्या आसपासच चाचण्या होत आहेत़

बीएससी विद्यार्थी, शिक्षकांचा चाचण्यांसाठी वापर करण्याचा पर्याय 

जिह्यामध्ये कोरोना चाचण्या कमी होण्यामागे अपुरे मनुष्यबळ असल्याचे सांगितले जात आह़े रत्ना†िगरी जिह्यामध्ये बीएससी झालेले अनेक  शिक्षक कार्यरत आहेत़ या मंडळींना प्रशिक्षण देवून कोरोना चाचण्या वाढविण्याचा पर्याय आह़े मात्र यासाठी प्रशासनाची इच्छाशक्ती नसल्याचे म्हटले जात आह़े

Related Stories

मालवणातील शिबिरात ४२ जणांचे रक्तदान

NIKHIL_N

आणखी 77 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

NIKHIL_N

गणरायाची आस स्वस्थ बसू देईना..!

NIKHIL_N

व्ही. एन. नाबर प्रशालेचा दहावीचा निकाल 100 %

Anuja Kudatarkar

कविवर्य आ.सो.शेवरे काव्य पुरस्कार कवी ‘देवा झिंजाड’ यांना जाहीर

NIKHIL_N

चिपळूणमधील ‘त्या’ प्रकरणावर भास्कर जाधवांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Archana Banage