Tarun Bharat

जिह्यात 8 बाधितांचा बळी : 69 मुक्त

Advertisements

सातारा  / प्रतिनिधी

जिल्हय़ात सध्या कराडनंतर साताऱयात बाधितांचे प्रमाण वाढत असून त्या पाठोपाठ खंडाळा, फलटण, महाबळेश्वरमध्ये बाधित समोर येत आहेत. जिल्हय़ात आजमितीस एकूण बाधितांची संख्या 4 हजार 560 असली तरी त्यातील निम्मे म्हणजे 2 हजार 287 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. सध्या उपचारार्थ रुग्णांची संख्या 2126 असून मंगळवारी 5 बाधितांच्या मृत्यूनंतर एकूण बळींची संख्या दीडशेकडे जावू लागली आहे. या स्थितीतच होम आयसोलेशनची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात येत असून बुधवारपासून जीम, योगा केंद्रे सुरु होणार आहेत. आता काळजी घेत न घाबरता कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांना सिध्द रहावे लागणार आहे.  जिह्यात सोमवारी 3 तर मंगळवारच्या अहवालात 5 अशा एकूण आठजणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, काल सोमवारी रात्रीच्या अहवालात 143 जणांचे अहवाल कोरोना बाधित, तीन मृत्यू असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये जिल्हा रुग्णालय येथे मल्हारपेठ, ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष, वाठार किरोली, ता. कोरेगाव येथील 39 वर्षीय पुरुष व सह्याद्रीनगर, वाई येथील 64 वर्षीय महिला या तीन  बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याचा सोमवारचा अहवाल आहे.

मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालाप्रमाणे जिल्हय़ात … एवढे बाधित, एवढे मृत्यू असल्याचे सांगण्यात तर तपशील मात्र बुधवारी सकाळी मिळणार आहे.  मंगळवारी मुक्त झालेल्यांची संख्य़ा 69 एवढी असून आजपर्यंत जिल्हय़ातील 2,287 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये 

69 नागरिकांची कोरोनावर मात

कराड तालुक्यात 20 मुक्त : शारदा क्लिनिक कराड 17 वर्षीय युवती 17 वर्षीय युवक  58, 37 वर्षीय महिला 24,20 वर्षीय पुरुष, खोडशी 1 वर्षीय बालक, 26 वर्षीय महिला, कासारशिरंबे 14 वर्षीय बालिका, कवठे 26 वर्षीय पुरुष,कालवडे 58, 50 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ 40 वर्षीय पुरुष, कार्वे 6 वर्षीय बालक, शामगाव  34 वर्षीय पुरुष, अटके येथील 90,59 वर्षीय पुरुष  82, 64, 26 वर्षीय महिला, मलकापूर येथील  53 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटल येथील 51 वर्षीय पुरुष.

ङपाटण तालुक्यातील 13 :  मुक्त नेरले 55 वर्षीय महिला, अंब्रग 55, 34, 23 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालीका 8 वर्षीय बालक 55 वर्षीय पुरुष, म्हावशी 42, 24, 54 वर्षीय पुरुष 58 वर्षीय महिला, निगडे येथील 35 वर्षीय महिला, अडुळ येथील 37 वर्षीय पुरुष,  ङवाईङ तालुक्यातील पसरणी  45 वर्षीय पुरुष 18, 16 वर्षीय युवक 42, 49 वर्षीय महिला, रेनावळे 28 वर्षीय पुरुष.

ङसातारा तालुक्यातील 20 मुक्त : कण्हेर 62 वर्षीय पुरुष 65 वर्षीय महिला, रामकुंड 35 वर्षीय पुरुष, तामजाईनगर 44 वर्षीय महिला, शनिवार पेठ 67 वर्षीय पुरुष 55 वर्षीय महिला, काशिळ येथील 23, 37 वर्षीय पुरुष 36, 60 वर्षीय महिला 19 वर्षीय युवक, लक्ष्मी टेकडी सदरबझार  1 पुरुष व 4 महिला 50 वर्षीय महिला, जिहे 38, 45 वर्षीय  पुरुष, पोगरवाडी 42 वर्षीय  पुरुष, शनिवार पेठ येथील 24 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ येथील 37 वर्षीय महिला, गुरुवार पेठ 33 वर्षीय पुरुष.

ङकोरेगांवङ तालुक्यातील शेळकेवाडी येथील 9 वर्षीय बालक, 26 वर्षीय पुरुष. जावलीङ तालुक्यातील रायगाव 43 वर्षीय पुरुष 34 वर्षीय महिला. फलटणङ रविवार पेठ 27 वर्षीय महिला.

मंगळवारी 5 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू

क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे सुरुर ता. वाई येथील 65 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा, सातारा येथील खाजगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील 57 वर्षीय पुरुषाचा, नाकिंदा ता. महाबळेश्वर येथील 60 वर्षीय पुरुषचा तसेच वाई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये  बावधन ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष व गोडवली  पाचगणी ता. महाबळेश्वर येथील 80 वर्षीय पुरुष अशा 5 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

होम आयसोलेशनसाठी प्रशासनाची तयारी

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी होम आयसोलेशन नवी रणनिती सोमवारी जाहीर केल्यानंतर मंगळवारी त्यासाठी प्रशासनाची तयारी व प्रशासनाकडून करण्यात येणाऱया मदतीविषयी सविस्तर माहिती दिली. वाढणाऱया बाधितांमध्ये 70 ते 80 टक्के रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले किंवा काही लक्षणे नसलेले असल्याचे समोर येत आहे. कोरोनाबाबत येणाऱया नवनवीन संशोधनानुसार त्याविरोधात लढण्याची रणनिती आखली जात असून आपल्या जिल्हय़ात देखील बाधित असलेले मात्र ज्यांना सौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणेच नाहीत तसेच त्यांना इतर कोणताही गंभीर नसेल तर त्यांना होम आयसोलेशनसाठी रेफर करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. या कालावधीत आरोग्य विभागाची टीम अशा रुग्णांची काळजी घेणार असून त्यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

432 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

जिल्हा रुग्णालय 28, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 111, उपजिल्हा रुग्णालय फलटण  15, कोरेगांव 4, वाई येथील 34, खंडाळा 77, पानमळेवाडी 23, मायणी 32,  महाबळेश्वर 5 व कृष्णा  हॉस्पिटल कराड 103 असे एकूण  432 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

Related Stories

लक्ष्मी टेकडी परिसरातही डेंग्यू, चिकुन गुनियाच?

Patil_p

दिलासादायक! महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 3,643 नवे रुग्ण; 105 मृत्यू

Rohan_P

…अन् उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात आले

datta jadhav

सातारा जिल्ह्यात उच्चांकी ६६९ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

अखेर लालपरीने ओलांडली जिल्ह्याची सीमा

Abhijeet Shinde

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात

datta jadhav
error: Content is protected !!