Tarun Bharat

जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; दोघांचा बळी

Advertisements

जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; वीज पडून दोघांचा बळी
पुरामुळे 149 जनावरांचा बळी : 872 घरांची पडझड
1  हजार 230 हेक्टरील पिकांचे नुकसान

प्रतिनिधी / सोलापूर

गतवषीपेक्षा शहर-जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी  सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, वादळी पावसामुळे दोन व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 149 जनावरे दगावली. 872  घरांची पडझड झाली आहे. 1230.20 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने याचा मोठा तडाखा बसला आहे.

मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि माढा या ठिकाणी मोठी हानी झाली आहे. 16 सप्टेंबर रोजी अक्कलकोट येथे घराची पडझड, मोहोळ येथे वीज पडून एक गाईचा मृत्यू, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस या ठिकाणी घरांची पडझड व एक व्यक्तीचा, जनावरांचा मृत्यू झाला आहे.  18 सप्टेंबर रोजी पंढरपुरातील कासेगाव, सिद्धेवाडी येथे एक म्हैस, दोन शेळय़ांचा मृत्यू, सांगोला येथे बारा घरांची पडझड, वीज पडून एक म्हैस दगावली. एकूण 14 घरांची पडझड झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला, तर 19 सप्टेंबरच्या अहवालानुसार 106 गावे बाधित झाली असून, 519 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. 783 घरात पाणी शिरले, तर 21 ठिकाणी वाहतुकीचा सुविधांवर परिणाम झाला आहे. एक व्यक्तीसह 140 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 872 घरांची पडझड झाली आहे. 

पुरूषासह एका महिलेचा समावेश

माळशिरस तालुक्मयातील झिंजे वस्ती येथील राघवेंद्र विष्णुपंत खरे (वय 49, शेंगोर्णी)  येथील ओढय़ाच्या पात्रात चारचाकी वाहून गेली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर माढा तालुक्मयातील भामाबाई पवार (रा. घोटी) यांचा मृत्यू झाला आहे. 149 जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. 872 घरांची पडझड झाली आहे.

एसटी, रस्ते वाहतूक बंद ठिकाणे

मंगळवेढा तालुक्मयातील सिद्धेवाडी येथील नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तीन रस्ते बंद झाले आहेत. यात मंगळवेढा-पंढरपूर-मंगळवेढा-पुणे, मंगळवेढा-अहमदनगर, पंढरपूर तालुक्मयातील भडीशेगाव वाडय़ावरील पूल पाण्याखाली आल्याने दोन रस्ते बंद झाले आहेत. उपरी येथील पूल पाणी गेल्याने दोन रस्ते बंद, तर माळशिरस तालुक्मयातील मळोली येथील पूल पाणी गेल्याने सांगोला-अकलूज, सांगोला-पुणे व सराटी येथील नीरा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने अकलूज- इंदापूर एक रस्ता बंद आहे.

Related Stories

जातीच्या मुद्दयावरून आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना राष्ट्रवादीचे उत्तर, म्हणाले…

Archana Banage

सातारा : संचारबंदी आदेश उल्लंघन प्रकरणी अठरा युवकांवर गुन्हा दाखल

Archana Banage

कोरोना : महाराष्ट्रात एका दिवसात 44,493 रुग्णांना डिस्चार्ज; 555 मृत्यू

Tousif Mujawar

मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करू नये : खासदार संभाजीराजे

Archana Banage

राजधानीतील मराठा मोर्चासाठी कोल्हापूरकर सज्ज

Archana Banage

पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे कार्यालय हलवा

Archana Banage
error: Content is protected !!