Tarun Bharat

जि.प.अध्यक्षांकडून दोडामार्ग ‘आरोग्य’चा आढावा

Advertisements

माकडताप्रश्नी जि.प.गंभीर! : तालुक्यातील आरोग्य केंद्राना भेटी

प्रतिनिधी / दोडामार्ग:

दोडामार्ग तालुक्यात माकडताप रुग्णांची संख्या वाढत असून तालुक्यातील आरोग्य स्थितीचा आढावा जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर व शिक्षण सभापती सावी लोके यांच्याकडून घेण्यात आला. मंगळवारी त्यांनी मोरगाव, तळकट व साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. जिथे समस्या उद्भवेल तिथे हक्काने सांगा, या प्रश्नी जि. प. गंभीर असून आरोग्य यंत्रणेला सर्वोतोपरी सहकार्य असेल, असेही त्यांनी सांगितले.

सुरुवातीला मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा देताना डॉ. अंधारी यांनी, माकडताप रुग्ण 14 असून पैकी दोघांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात उर्वरित बारा जणांची तब्येत व्यवस्थित आहे. औषध पुरवठाही आवश्यक तेवढा आहे. मात्र, रिक्त पदे तातडीने भरणे, दोडामार्ग येथे लसीकरण केंद्रासाठी जागा उपलब्ध करा, अशी मागणी केली. यावेळी म्हापसेकर यांनी, कंत्राटी पद्धतीने पदभरतीबाबत विचार करण्याकडे अध्यक्ष व आरोग्य सभापतींचे लक्ष वेधले.

तळकट परिसरात बाहेरुन आलेल्या 946 जणांची तपासणी

  येथील वैद्यकीयअधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर यांनी सांगितले, तळकट परिसरात माकडताप रुग्ण नाहीत. तो प्रश्न तूर्त नसला तरी कोव्हीड 19 मुळे रुग्णसेवेवर ताण पडत आहे. सध्या या परिसरात बाहेरुन 946 जणांची तपासणी करण्यात आली. यातील जवळपास 800 जणांचे क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. बाकीच्यांचे जवळपास 20 दिवस झाले असून सर्वजण ठणठणीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध पुरवठा व विशेष निधी तसेच कार्यक्षेत्रातील सहापैकी तीन उपकेंद्रावर कर्मचारी रिक्त आहेत. याकडेही डॉ. चिपळूणकर यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधले. सायंकाळी साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत डॉ. गजानन सारंग यांच्याकडूनही आढावा घेतला.

हा आहे आरोग्य केंद्रांचा महत्वाचा प्रश्न

  मोरगाव व तळकट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सावंतवाडी तालुक्यातील जवळपास 13 गावे येतात. त्यामुळे त्या कार्यक्षेत्रात काम करताना अनेकवेळा समन्वयाचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत जिल्हा प्रशासनाने विशेष सर्व्हे करून काही गावे वगळणे व सामाविष्ट करणे यासाठी प्लॅन करावा, अशी मागणी डॉ. अंधारी व डॉ. चिपळूणकर यांनी केली. यावेळी उपाध्यक्ष म्हापसेकर यांनी ही मागणी योग्य असून लोकसंख्येचा निकष पाहून न करता भौगोलिक डोंगराळ क्षेत्र व विशेष बाब म्हणून याकडे लक्ष देण्यात येईल, असे सांगितले. ,l.definitions[c]||{},v[c]),function c(l,z){var h=Object.keys(z).reduce(function(c,l){var h=z[l];re

Related Stories

ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत एनडीआरफ दाखल

Anuja Kudatarkar

चिपळुणात अल्पवयीन तरुणीचे अपहरण

Patil_p

मे 2020 मध्ये संपली आहे जिल्हा बँकेची मुदत

NIKHIL_N

आचरा केंद्रशाळेत जवानांना श्रद्धांजली अर्पण

Anuja Kudatarkar

मालवणात तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Anuja Kudatarkar

‘झारा बिल्डर्स’ला साडेनऊ लाख भरण्याची नोटीस

Patil_p
error: Content is protected !!