Tarun Bharat

जि.प.अध्यक्षांच्या आरोग्य केंद्रांना भेटी

Advertisements

डॉक्टरांसाठीच्या सेफ्टी कीट तात्काळ मिळवून देणार

जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांची ग्वाही

प्रतिनिधी / साटेली-भेडशी:

जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी गुरुवारी दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱया सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेत संबंधित वैद्यकीय अधिकाऱयांशी संवाद साधला.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जि. प. अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी गुरुवारी दोडामार्ग तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जि. प. सदस्य दादा कुबल, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, संजय विर्नोडकर, महेश लोंढे आदी उपस्थित होते.

जि. प. अध्यक्षा सौ. नाईक यांनी तालुका दौऱयाची सुरुवात प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली-भेडशी येथे भेट घेत येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांच्याशी संवाद साधत आरोग्य केंदात उपलब्ध औषधसाठा, सॅनिटायझर, मास्क याची माहिती घेत आवश्यक असलेल्या वस्तूंची मागणी करण्यास सांगितले. या केंद्रांतर्गत येणाऱया गाववार होम क्वारंटाईन, मुंबई, पुणे व इतर शहरातून दाखल झालेल्या नागरिकांची यादी, त्यांच्याबद्दल करण्यात आलेली कार्यवाही, सध्या इतर आजाराबाबत उपचार घेत असलेल्या रुग्णाबाबत आढावा घेतला. त्यानंतर तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळुणकर यांच्याशी चर्चा करीत तेथील परिस्थिती तसेच महत्वाचे म्हणजे या परिसरात आढळणारे माकडताप आजार बाधित पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रुग्ण, या रुग्णांचे आलेले अहवाल याबाबत चर्चा केली. माकडताप परिस्थिती अधिक चांगल्याप्रकारे हाताळणारे डॉ. चिपळुणकर यांनी सर्व माहिती यावेळी दिली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव केंद्राला भेट घेत तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती एम. डी. अंधारी यांच्याशी संवाद साधत येथील आरोग्य केंद्रातील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. आवश्यक औषधसाठा, या आरोग्य केंद्रांतर्गत  गाववार आढावा घेतला. यावेळी अध्यक्षा सौ. नाईक, उपाध्यक्ष म्हापसेकर यांनी जिल्हा परिषदेमार्फत सर्वप्रकारे सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले. म्हापसेकर यांनी उपचार करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांना ‘सेफ्टी कीट’ तात्काळ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे म्हापसेकर यांनी सांगितले.

Related Stories

अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर डिस्चार्ज दिलेल्या रुग्णाला तातडीने आणले!

NIKHIL_N

राज्यभर २५ नोव्हेंबरपासून ‘कामबंद आंदोलन’ छेडणार

Archana Banage

केंद्राकडून महाराष्ट्राबाबत दुजाभाव : मंत्री सामंत

Archana Banage

वेंगुर्लेतील रेकॉर्ड डान्स आणि नृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर

Anuja Kudatarkar

वादळानंतर मालवणात सापडले ‘शिणाणे’

NIKHIL_N

रत्नागिरी : दापोलीत विना मास्क व्यक्तींवर धडक कारवाई

Archana Banage
error: Content is protected !!