Tarun Bharat

जीएसएलतर्फे गोव्याला ऑक्सजिन जनरेटिंग प्लांट

Advertisements

प्रतिनिधी / पणजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविड 19 विरोधातील लढय़ात संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दले युध्य पातळीवर काम करत असून संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱया गोवा शिपयार्ड लिमिटेडने (जीएसएल) गोवा सरकारचे हात बळकट करण्याच्या दृष्टीने कोविड इस्पितळासाठी लागणारा ‘ऑनसाईट ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट’ उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे, असे रक्षा राज्यमंत्री श्रीपाद नाईक सांगितले.

 मंत्री नाईक यांच्या प्रयत्नामुळे गोवा शिपयार्ड लिमिटेडने गोवा सरकारला त्यांच्या कोविद महामारी विरोधातील लढय़ात आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा शिपायार्ड लिमिटेडने देऊ केलेल्या या प्लांटचा खर्च अंदाजे एक कोटी रुपये असून गोवा सरकारच्या कोविड विरोधातील लढय़ात यामुळे निश्चितच अधिक बळ मिळेल, अशी खात्री नाईक यांनी व्यक्त केली आहे.

प्रस्तवित ऑक्सिजन प्लांटची उत्पादन क्षमता एका मिनिटाला 960 लिटर्स वैद्यकीय ऑक्स एवढी असून हा प्ला?ट एका महिन्याच्या कालावधित उभा राहू शकतो, अशी ग्वाही श्री. नाईक यांनी दिली  आहे.

पंतप्रधान श्री. मोदी यांनी ऑक्सजिनचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि आरोग्य सुविधांना ऑक्सजिन पुरवठा करण्यासाठी नवनवीन पद्धती वापरण्यावर भर दिला आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडने उचललेले महत्वाकांक्षी पाऊल या प्रयत्नाचा एक भाग आहे.

याशिवाय वैद्यकीय ऑक्सजिनची निकड लक्षात घेऊन गोवा शिपयार्ड लिमिटेड अंदाचे 26 लाख रुपये किंमतीचे 40 ‘ऑक्सजिन कॉन्स?नटेटर्स ‘ गोवा सरकारला उपलब्ध करुन देणार असून  पैकी 4 ऑक्सजिन कॉन्स?नटेटर्स गोव्याच्या वैद्यकीय अधिकाराणीकडे सुपूर्दही करण्यात आले आहेत.

कोवि 19 चा प्रसार रोखण्यासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने आपल्या जुआरीनगर, गोवा येथील युनीट 3 मध्ये 25 खाटा असलेले “आयजोलेशन” केंद्र तयार ठेवले असल्याने श्री. नाईक यांनी पुढे नमूद केले.

Related Stories

गरज पडल्यास आयआयटी विरोधात मुख्यमंत्री निवासस्थानी आंदोलन करणार

Omkar B

पंढरपूरला कसा पोहोचलो ते आठवत नाही

Amit Kulkarni

महिला दिन विशेष

Amit Kulkarni

वाळपई मतदारसंघात नवीन मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने

Amit Kulkarni

दहावी परीक्षेच्या उपकेंद्रांत 168पर्यंत वाढ

Omkar B

हेदोडे येथील नदीत बुडून दीपक खरवत यांचे दुर्दैवी निधन

Omkar B
error: Content is protected !!