प्रतिनिधी /बेळगाव
जीएसएस कॉलेजच्या आयक्मयुएसी विभागातर्फे 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी बीएससी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे उद्घाटन जिमखाना सभागृहात झाले. प्राचार्य पी. एल. मजुकर यांनी स्वागत करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्यासपीठावर एसकेईचे अध्यक्ष सेवंतीलाल शहा, उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू आदी उपस्थित होते.
डॉ. बसवराज पद्मशाली यांनी येत्या शैक्षणिक वर्षांपासून कर्नाटकात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार असून या अंतर्गत विद्यार्थ्यांना एकाचवेळी विविध विषय अभ्यासता येतील, असे सांगितले. हे धोरण नवीन असल्यामुळे त्यामध्ये बदल घडण्याची शक्मयता आहे. मात्र कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सोयीसुविधांचा उपयोग करून घेत करिअर घडवा, असे सांगितले.
एस. वाय. प्रभू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पदवी शिक्षणासाठी जीएसएस कॉलेजची निवड केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी तत्पर असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. प्रा. बी. एल. तोपीनकट्टी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रकाश शानभाग, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.