Tarun Bharat

जीएसटीची सुधारित आवृत्ती एप्रिलपासून

Advertisements

 ऑनलाईन टीम / दिल्ली :

वस्तू आणि सेवा कराची (GST) सुधारित आवृत्ती येत्या एप्रिलपासून लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

‘जीएसटी’ने मागील दोन वर्ष आव्हानांचाही सामना केला, पण बदल करण्यासाठी जीएसटी परिषदेने काम केले. आतापर्यंत आपल्याला नवीन 16 लाख करदाते मिळाले असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. 2017 मध्ये देशात जीएसटी लागू झाला होता. त्यातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न जीएसटी कौन्सिलकडून केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. जीएसटीमधील कपातीचा ग्राहकांना फायदा झाला. ग्राहकांचे जवळपास 1 लाख कोटी वाचले असा दावा सीतारामन यांनी केला. एप्रिलपासून जीएसटीची नवी सुधारित आवृत्ती लागू होईल. ही प्रणाली सुधारित आणि सुटसुटीत असेल असे त्यांनी सांगितले.

 

Related Stories

आज ‘रेल रोको’ आंदोलनाची हाक

Patil_p

नितीश-तेजस्वींने जिंकला विश्वासदर्शक ठराव

Patil_p

दिल्लीत दिवसभरात 707 नवे कोरोना रुग्ण; 20 मृत्यू

Tousif Mujawar

दहशतवाद्यांची ट्रकमधून वाहतूक; तिघांचा खात्मा

prashant_c

गुजरात विधानसभा निवडणुक : अपक्ष निवडणूक लढणाऱ्या ७ जणांना भाजपने केले निलंबित

Abhijeet Khandekar

Oxygen Shortage:महाराष्ट्राच्या हितासाठी काहीही करायला तयार -राजेश टोपे

Archana Banage
error: Content is protected !!