Tarun Bharat

जीएसटी संकलनात ‘धनो’त्सव

Advertisements

ऑक्टोबरमध्ये 1.30 लाख कोटी रुपये जमा ः वाढत्या संकलनाने अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे संकेत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गेल्या दीड-पावणेदोन वर्षात कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठाच फटका बसला असताना आता ती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे स्पष्ट संकेत आता मिळू लागले आहेत. दिवाळीच्या तोंडावरच ऐन धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या जीएसटी संकलनाच्या आकडय़ाने देशवासियांना मोठा दिला दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर 2021 या एका महिन्यात 1 लाख 30 हजार 127 कोटी रुपये जीएसटीचे संकलन झाले. मागच्या वषीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा 24 टक्के जास्त कर जमा झाला आहे. जीएसटी व्यवस्था लागू झाल्यापासूनचे एका महिन्यातील हे दुसऱया क्रमांकाचे सर्वाधिक जीएसटी संकलन आहे. तसेच सलग चौथ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी संकलन झाले.

मागील काही महिन्यांपासून देशाच्या जीएसटी संकलनात उत्साहवर्धक अशी वाढ दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान होताना दिसत आहे. उद्योगधंदे आणि व्यापाराला पुन्हा वेग येऊ लागल्याने जीएसटी करसंकलनातही वाढ दिसून येते आहे. हे जीएसटी संकलन देशाच्या आर्थिक प्रगतीचे लक्षण असल्याचे मत अर्थ मंत्रालयाने व्यक्त केले आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी महसूल 1.30 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. देशात 2017 मध्ये जीएसटी करप्रणाली लागू केल्यापासूनचे हे दुसरे सर्वाधिक कर संकलन आहे. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये 1.41 लाख कोटी रुपये इतके विक्रमी करसंकलन नोंद झाले आहे. तसेच सप्टेंबर 2021 मध्ये 1.17 लाख कोटी इतका कर जमा झाला होता.

विभागनिहाय करसंकलन

ऑक्टोबर 2021 या महिन्यात 1 लाख 30 हजार 127 कोटी रुपये जीएसटीचे संकलन झाले. जीएसटी महसूलातील एकूण संकलनात सीजीएसटी करसंकलन 23,861 कोटी रुपये, एसजीएसटी करसंकलन 30,421 कोटी रुपये, आयजीएसटी करसंकलन 67,361 कोटी रुपये आणि सेजद्वारे 8,484 कोटी रुपयांचे करसंकलन झाल्याची माहिती सोमवार, 1 नोव्हेंबर रोजी अर्थ मंत्रालयाने जाहीर केली.

केंद्र-राज्याचा वाटा निश्चित

एकूण ‘आयजीएसटी’पैकी सरकारने 27,310 कोटी रुपयांचे सीजीएसटी (केंद्रासाठी) आणि 22,394 कोटी रुपयांचे एसजीएसटी (राज्यांसाठी) कर सेटल केले आहेत. एकंदर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांसाठीच्या नेहमीच्या सेटलमेंटनुसार सीजीएसटी 51,171 कोटी रुपये आणि एसजीएसटी 52,815 कोटी रुपये आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भरभराट

मागील वषीच्या याच कालावधीशी तुलना करता ऑक्टोबर महिन्यात महसूलात 24 टक्क्मयांची जबरदस्त वाढ झाली आहे. 2019-20 च्या ऑक्टोबर महिन्याशी तुलना करता ही वाढ 36 टक्के इतकी आहे. आयातीतून मिळणाऱया जीएसटी करात 39 टक्के वाढ झाली आहे तर देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱया करात मागील वर्षाच्या तुलनेत 19 टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात अधिकाधिक लोकांकडून जीएसटी करप्रणालीनुसार कर भरल्यामुळे करसंकलनात वाढ झाली आहे. त्याचबरोबर एसएमएसद्वारे नील फायलिंग, तिमाही रिटर्न, मंथली पेमेंट सिस्टम आणि रिटर्नचे ऑटो-पॉप्युलेशन यामुळे करसंकलनात वाढ झाली आहे.

कडक नियमावलीमुळे कंपन्यांना चाप

जीएसटी कौन्सिलने करव्यवस्थेचे पालन न करणाऱयांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. करचुकवेगिरी, बनवेगिरी यांना आळा घालण्यासाठी जीएसटी कौन्सिलकडून पावले उचलण्यात येत आहेत. तसेच जुन्या रिटर्न फायलिंगवरील विलंब शुल्क माफ करण्याचे ठरवले आहे. जीएसटी कौन्सिल आणि सर्वच व्यवस्थेकडून उचलण्यात आलेल्या विविध पावलांमुळे जीएसटी भरण्याच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच करामुळे मिळणाऱया महसूलातही वाढ झाली आहे.

Related Stories

अनलॉकच्या पहिल्या दिवशीच दिल्लीकरांना मोठा दिलासा! रुग्ण संख्येत घट

Rohan_P

नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसबद्दल केले ”हे” वक्तव्य

Abhijeet Shinde

शशी थरूर अध्यक्षपदाच्या शर्यतीत?

Patil_p

मुख्य सचिवांना मारहाण प्रकरण : अरविंद केजरीवाल – मनिष सिसोदिया यांची निर्दोष सुटका

Rohan_P

पीडीपीच्या तीन प्रमुख नेत्यांचा राजीनामा

datta jadhav

सोनिया गांधी ईडीसमोर गैरहजर

Patil_p
error: Content is protected !!