Tarun Bharat

‘जीमेल’वर मेल, चॅटसह मिळणार अन्य सुविधा

जीमेलच्या ऍप सेवेमध्ये होणार बदल : एप्रिलपासून नवी फिचर्स वापरात शक्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गुगलची जीमेल सर्व्हिस आजपासून बदलणार आहे. कंपनीने ऍपच्या वापरासाठी नवीन लेआउटची पडताळणी सुरु केली आहे. यानंतर हळूहळू ग्राहकांसाठी रोलआउट करण्यात येणार आहे. एप्रिलपर्यंत सर्व ग्राहकांसाठी हा लेआउट मिळणार आहे. नवीन फिचर्सच्या माध्यमातून जीमेलचा वापर करण्यासाठी अधिक सोपे होणार आहे. यामध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर मेल, चॅट, स्पेस आणि मीट आदी पर्याय मिळणार आहेत.

जीमेल ऍपचा वापर वाढल्यानंतर ग्राहकांना मेल आणि मीटचा पर्याय मिळणार आहे. नवीन फिचर्सची सेवा मिळणार असून यामध्ये ग्राहकांना मेल, चॅट, स्पेस आणि मीट असे चार पर्याय वापरता येणार आहेत. म्हणजे ग्राहकांना एकाच वेळी विविध पर्यायाची आवश्यकता भासणार नाही.

बदल झालेले नवे फिचर्स

मेल ः ऍपचा सर्वात पहिला पर्याय मेलचा राहणार आहे.

चॅट ः दुसऱया पर्यायात जीमेल ग्राहकांसाठी चॅटचा पर्याय मिळणार यासाठी टॅप करावे लागणार आहे.

स्पेस ः जीमेल ग्रुप चॅटसाठी स्पेसचा पर्याय असणार आहे.

मीट ः या पर्यायायावरील ग्राहकांना व्हिडीओ मिटींग करता येणार आहे.

Related Stories

अंतिम दिवशी बाजारात सेन्सेक्सची उसळी

Patil_p

आशियाई अर्थव्यवस्थेत भारताचा डंका, तिसऱया क्रमांकावर

Patil_p

कोलगेट-पामोलिवच्या येणार रिसायकलयोग्य टूथपेस्ट टय़ुब्ज

Amit Kulkarni

मागच्यावर्षी सोने मागणी 35 टक्क्यांनी घटली

Patil_p

पाच वर्षांत युनिकॉर्न स्टार्टअप संख्या 10 पटीने वाढली

Patil_p

डीएलएफची 100 कोटींची गुंतवणूक

Patil_p