Tarun Bharat

जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रीडा आवश्यक

डॉ. प्रसाद रामपूरे यांचे प्रतिपादन : बी. के. महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे उद्घाटन

प्रतिनिधी / चिकोडी

दैनंदिन जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रीडांना महत्त्व आहे. सदृढ आरोग्य व खिलाडूवृत्तीने जीवनातील संकटावर मात करण्यासाठी त्याची नितांत गरज असते. पालकांनी मुलांना बालपणापासूनच खेळात गुंतवावे. लहानपणी खेळताना त्यांना रोखण्यात येते तर मोठेपणी त्यांना खेळासाठी प्रोत्साहित केले जाते. पण बालपणापासूनच पालक व मुलांनी केवळ शाळेतील गुणांच्या मागे न धावता क्रीडेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद रामपूरे यांनी केले. येथील केएलई संस्थेच्या बी. के. महाविद्यालयात वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे उद्घाटन करून ते बोलत होते.

प्राचार्य उदयसिंग रजपूत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. ग्रंथपाल प्रकाश वाय. यांनी उत्तम वाचक विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण केले. भाग्यश्री सावंत यांच्या प्रार्था गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सुरेश वंजीरे, डॉ. बी. जी. कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. एस. एम. पानबुडे यांनी स्वागत तर जे. एल. कदम व सिद्धन्ना नायक यांनी सूत्रसंचालन केले. जी. एस. बारंगी यांनी आभार मानले.

Related Stories

संरक्षक भिंतीमुळे गाळे बंदिस्त

Amit Kulkarni

महाराष्ट्रातून सीमाभागाला ‘अवैध मद्यपुरवठा’

Patil_p

बेळगाव जिह्यात बुधवारी 456 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

विजया चषक स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स क्लब विजेते

Amit Kulkarni

सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाईन वाहन परवाना मिळण्यास विलंब

Patil_p

सण येता दारी, मिळे बाजारपेठेला उभारी

Amit Kulkarni