Tarun Bharat

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध : अमित शहा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील लॉक डाऊन तीन मे पर्यंत वाढत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत पंतप्रधानांच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच  देशात मुबलक प्रमाणात अन्नधान्य साठा, जीवनावश्यक वस्तू, औषधे उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, देशामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव अजून वाढू नये आणि भारतवासीयांचे संरक्षण व्हावे म्हणून या हेतूने पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो आणि आभार मानतो. 

लॉक डाऊन च्या काळात सर्व राज्ये केंद्र सरकार सोबत काम करत आहेत. तसेच आपल्या देशात सद्यस्थितीत अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही.

तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील गरीब जनेतला मदत करावी असे आवाहन अमित शहा यांनी यावेळी केले. 

Related Stories

कोव्हॅक्सिनची चौथ्या टप्प्यातील चाचणी लवकरच

Patil_p

रशियाने तयार केले कोरोनावर प्रभावी औषध

datta jadhav

भारत बायोटेकच्या नेझल लसीची किंमत निश्चित; लवकरच होणार उपलब्ध

datta jadhav

ICC-World Cup 2022-जिंकलो… टिम इंडियाने पाकिस्तानवरील विजयाने साजरी केली दिवाळी

Kalyani Amanagi

प्रताप सरनाईकांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; ईडीच्या भूमिकेकडे लक्ष

Archana Banage

एअर इंडियाचा देशांतर्गत प्रवास 4 मे पासून सुरू

prashant_c