Tarun Bharat

जीवनावश्यक वस्तू निर्मिती करणारे उद्योग सुरू

उद्यमबाग डीआयसी कार्यालयात परवानगीसाठी गर्दी

प्रतिनिधी / बेळगाव

जीवनावश्यक वस्तू व साहित्याची निर्मिती करणारे उद्योग सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. यामुळे बुधवारपासून औद्योगिक वसाहतींमधील उद्योग काही प्रमाणात सुरू करण्यात आले. डीआयसीकडून (जिल्हा औद्योगिक केंद्र) परवानगी मिळविलेल्या कारखान्यांमध्ये कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर औद्योगिक वसाहतींमध्ये पुन्हा एकदा यंत्रांची धडधड ऐकू आली.

अन्नधान्य, मेडिकल, कृषी अवजारे, ट्रक्टर, एव्हिएशन, रेल्वे, डिफेन्स यासह इतर महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी साहित्य निर्मिती करणाऱया उद्योगांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. कर्नाटकातील इतर जिहय़ात परवानगी असतानाही बेळगावमध्ये परवानगी देण्यात न आल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेऊन अत्यावश्यक सेवा व साहित्य निर्मिती करणाऱया उद्योगांना परवानगी देण्यात आली. बुधवारी पहिलाच दिवस असल्याने अल्पप्रमाणात उद्योग सुरू होते. परवानगी मिळेल त्याप्रमाणे कारखाने सुरू करण्यात येत होते.

परवानगी सक्तीची

बेळगावमध्ये अत्यावश्यक सेवा व साहित्य निर्मिती करणारे अनेक उद्योग आहेत. ते सुरू करण्यासाठी परवानगी सक्तीची केली आहे. ऑर्डर मिळविलेल्या कंपनीच्या करारपत्रासह कागदपत्रे दिल्यानंतर परवानगी मिळत आहे.

परवानगी पत्र मिळविण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच उद्यमबाग येथील डीआयसी कार्यालयात उद्योजकांची गर्दी झाली होती.

कारखाने सुरू पण पूरक साहित्याचे काय?

जिल्हा प्रशासनाने कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी इतर पूरक साहित्याची दुकाने बंद असल्याने अडचणी येत आहेत. कारखान्यांना लागणारे पूरक साहित्य उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी उद्योग बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच इतर कारखाने सुरू करण्यास परवानगी नसल्याने कोणतेही काम असल्यास जीवनावश्यक साहित्य निर्मिती करणाऱया कारखान्यांना थांबावे लागत आहे.

Related Stories

मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यसभेची उमेदवारी

datta jadhav

आंदोलक कामगारांच्या पगाराला कात्री

Amit Kulkarni

विजापूर जिल्हय़ात 176 किलो रोपे, 3 किलो गांजा

Patil_p

बीडीके ए, अमृत पोतदार सीसीए, हुबळी स्पोर्ट्स अ विजयी

Amit Kulkarni

निवृत्त जवानाच्या कारची काच फोडली

Omkar B

Patil_p